
प्रतिनिधी -सोलापूर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कारंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान, तसेच नागरिकांसाठी मोफत रक्तदाब (B.P.) व शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन ‘लाभ आपल्या दारी’ या उपक्रमातून नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हा कार्यक्रम बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वामी समर्थ विठ्ठल मंदिर, बहिर्जे नगर, कारंबा, ता. उत्तर सोलापूर येथे होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चा – सोलापूर पूर्व यांच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व कारंबा ग्रामपंचायत सदस्य तसेच मा. लोकनियुक्त सरपंच कौशल्या सुतार यांचा सहभाग राहणार आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















