
प्रतिनिधी – सोलापूर
दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर यांचे वतीने दिनांक ६ ऑक्टोंबर ते १४ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत रुक्मिणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.

पुढे माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन म्हणाले की सदर रुक्मिणी सप्ताह अंतर्गत 6 ऑक्टोबर रोजी नवीन गट स्थापनेसाठी प्रभातफेरी काढणे, गृहभेटी करणे, गट स्थापना करणे , नवीन स्थापन झालेले गट ऑनलाईन करणे. 7 ऑक्टोबर रोजी गट, ग्रामसंघ, कट ऑफ पूर्ण करणे मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करणे, इकेवायसी करणे , ज्या गटांचे, ग्रामसंघाचे कट ऑफ पूर्ण झाले आहे त्यांचे नियमित रिपोर्ट भरणे. 8ऑक्टोबर रोजी नवीन गटांचे खाते काढण्यासाठी बँकेत प्रलंबित असलेले प्रस्ताव यांचे खाते उघडणे, प्रति प्रभाग ५० बँक कर्जाचे प्रस्ताव तयार करणे, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण झालेले सक्षम अँप वर नोंदी करणे , NPA गटांचे बँक कर्ज भरणे. 9 ऑक्टोबर रोजी RF, CIF निधीचे प्रस्ताव ऑनलाईन करणे, प्रभागसंघावर शिल्लक असलेला CIF निधी गटांना वितरीत करणे, वितरीत केलेला CIF निधी ऑनलाईन करणे , वैयक्तिक उद्दोगाचे प्रस्ताव जनसमर्थ पोर्टल वर ऑनलाइन करणे व जनसमर्थ वरील प्रलंबित प्रस्ताव बँकेतून मंजूर करून घेणे, व बँकेत प्रलंबित असलेले गटांचे बँक कर्जाचे प्रस्ताव मंजूर करून घेणे , OSF व SVEP अंतर्गत कर्जवाटप करणे.12ऑक्टोबर रोजी वैयक्तिक उद्दोग व्यवसायची माहिती She leaps मध्ये ऑनलाईन करणे, PMFME अंतर्गत सीड कॅपिटल व 35% सबसिडीचे प्रस्ताव ऑनलाईन करणे , उद्यम आधार व फूड लायसन्स प्रस्ताव ऑनलाईन करणे. दिनांक 13 ऑक्टोबर रोजी लखपती दीदी माहिती ऑनलाईन भरणे, लखपती दीदी ऑफ लाईन रजिस्टर लिहिणे, लखपती दीदी झालेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करणे. दिनांक 14 ऑक्टोबर रोजी कृतीसंगम अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे, महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्ज दाखल करणे , प्रमाणपत्र वाटप करण इ . उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप म्हणाले की, उमेदच्या वतीने सदर रुक्मिणी महोत्सव साठी जिल्हा व तालुका स्तरावर प्रत्येक उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.सदर सप्ताहासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समिती तयार करण्यात आली असून सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी उमेदची सर्व यंत्रणा प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, मीनाक्षी मडवळी, अनिता माने उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















