Saturday, November 21, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’ सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
November 12, 2026
in solapur`
0
‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’  सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – सोलापूर 

दिवाळीचा सण केवळ दिव्यांच्या रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याच्या उद्देशाने सारथी युथ फाऊंडेशनच्या वतीने सोलापुरात अनोख्या दिवाळी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया’ आणि ‘इतरांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरवून दिवाळी साजरी करूया’ या संदेशातून तरुणाईमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमाला भवानी पेठ येथील ‘वेव्ह्ज डान्स अकॅडमी’चे संचालक तथा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक राकेश मनोहर सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी अतिथी नृत्यप्रशिक्षक म्हणून युवकांना मोफत नृत्यप्रशिक्षण दिले. तसेच झुंबा सत्राच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देत निरोगी आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश दिला.

कार्यक्रमात विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना दिव्यांचे वाटप करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला. व्यसनमुक्तीचा संदेश देणारी आकर्षक रांगोळी आणि फुलांची सजावट हे उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. याशिवाय सजावटीसोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर फोटो शेअर करण्याची स्पर्धाही घेण्यात आली. यामुळे व्यसनमुक्तीचा सकारात्मक संदेश डिजिटल माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्वेता पाटील, स्नेहा चौगुले, भाग्यश्री शिगरकंटी, लक्ष्मी शिगरकंटी, श्रावणी मुदगल, श्रेया मुदगल, समर्थ कोळी, समृद्धी वाघमारे, श्रीकन्या गोसावी, वेदांत चाबुकस्वार, रोहन चाबुकस्वार, वैष्णवी चाबुकस्वार, कार्तिक चाबुकस्वार, अरमान शेख, नागेश्वर स्वामी, शक्ती स्वामी, दिव्यानी चौगुले आणि सोनाक्षी पवार या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

नृत्य, कला, आरोग्य आणि सामाजिक जनजागृती यांचा सुंदर संगम घडवून आणत सारथी युथ फाऊंडेशनने दिवाळी साजरी करण्याचा वेगळा आदर्श निर्माण केला. मनोरंजनासोबतच व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सोलापूर शहरातून कौतुक होत आहे.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

हक्काच्या घरासाठी पत्रकार रस्त्यावर; घरकुल मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार – प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार

Next Post

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

by Janta Sangharsh News
November 16, 2026
0

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयामार्फत बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्कंडेय उद्यान, सोलापूर येथे ‘पहाट गाणी’...

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’  सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’ सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  दिवाळीचा सण केवळ दिव्यांच्या रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याच्या उद्देशाने...

हक्काच्या घरासाठी पत्रकार रस्त्यावर; घरकुल मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार – प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार

हक्काच्या घरासाठी पत्रकार रस्त्यावर; घरकुल मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार – प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर समाजातील वंचित, पीडित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवणाऱ्या पत्रकारांनाच आज...

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्सचा दिमाखात शुभारंभ.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्सचा दिमाखात शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन; कुंभेज फाटा परिसरातील ग्राहकांना स्टील व हार्डवेअर साहित्याची सुविधा करमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील...

बोनसच्या यादीतून ६० कर्मचारी वगळले; महापौरांच्या हस्तक्षेपानंतर बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार?

बोनसच्या यादीतून ६० कर्मचारी वगळले; महापौरांच्या हस्तक्षेपानंतर बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार?

by Janta Sangharsh News
November 11, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील तब्बल ६० कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसच्या यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या...

Load More

वेबसाईट दर्शक

0044981

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697