
प्रतिनिधी – सोलापूर
तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयामार्फत बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्कंडेय उद्यान, सोलापूर येथे ‘पहाट गाणी’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमातून तेलुगु, मराठी आणि कन्नड गीतांची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तेलुगु तल्ली यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर तेलुगु गायिका साईभव्याश्री, अनुराधा गंगूल, देवता सुधाकर तसेच गायक श्रीनिवास, कोटी, मुरली आणि गोवर्धन कमटम यांनी आपल्या सुरेल व मधुर आवाजाने पहाट भक्तिमय आणि संगीतमय केली.
यावेळी ‘कानडा विठ्ठला’, ‘तेनेकैना तियनिधी’, ‘अदिगो अल्लरीगो’, ‘मुत्यमंता पसपू मोखमेंतो छाया’, ‘प्रभाते कर दर्शनम’ आदी तेलुगु, मराठी व कन्नड गीतांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मेलडी स्टॉर्स ऑफ जब्बार अँड ग्रुपच्या कलाकारांनी संगीताची उत्तम साथ दिली, तर धनंजय अंबेकर यांनी वादनाची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमानंतर सर्व गायकांचा टॉवेल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश बुधारम, व्यंकटेश गुंडला, नारायण बोमड्याल, गोवर्धन कोडम, सुधाकर गुंडेली, घनश्याम येमूल, मधुकर येमूल, श्रीनिवास गाली, बालराज बोल्ली, पेंटप्पा गड्डम, अशोक विद्युत, गणेश कमटम, सदानंद चिंता आणि हरिकृष्णा अल्ली यांनी विशेष आर्थिक योगदान दिले.
ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम, उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदूल, सचिव तिपण्णा गणेरी, सहसचिव प्रभाकर भिमनाथ, संजीव नादरगी, शंकर चौगुले आणि ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडुर आदींनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी अॅड. श्रीनिवास क्यातम, अॅड. व्यंकटेश गुंडेली, अॅड. श्रीनिवास कटकूर, दत्तात्रय गुंडेली, पुरुषोत्तम बुधारम, राजेंद्र गाजूल, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, कुमारस्वामी नक्का, आनंदम श्रीपुरम, पुष्पलता जडल, श्रीनिवास आकेन, नरेंद्र दारा आदी मान्यवरांसह परिसरातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री रेणुका बुधारम यांनी केले, तर आभार प्रदर्शन कवी नरेंद्र गुंडेली यांनी केले. सुरेल गीतांच्या माध्यमातून भाषिक आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश देणारा हा पहाट गाणी कार्यक्रम रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















