
प्रतिनिधी – सोलापूर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवात *‘युवा क्रांती कलामंच’*ने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. समूह लोकगीत, समूह लोकनृत्य आणि पथनाट्य या तिन्ही स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावत कलामंचाने आपली कलात्मक छाप उमटवली.

या यशाबद्दल समूह लोकनृत्य स्पर्धेत ५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, समूह लोकगीत स्पर्धेत ३ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तर पथनाट्य स्पर्धेत ३ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्कार प्रदान करण्यात आले.समूह लोकगीत स्पर्धेत योगेश सोनवणे, यश वाघमारे, ऋषिकेश चौघुले, सानिका कांबळे, पल्लवी उदगिरी, धनश्री स्वामी व अनुष्का रच्चा यांनी सहभाग घेतला. समूह लोकनृत्य स्पर्धेत रक्षिता सलगर-बळूरगी, शुभम बडगंची, समृद्धी शिंदे, साक्षी मुळे, पूनम कांबळे, प्रतीक्षा परडे व प्रारब्धा भालेराव यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. पथनाट्य स्पर्धेत संकेत सलगर, आर्यन गिरवलकर, शरीफ पठाण, केदारनाथ गुंड्यद, शुभम वेदपाठक, यशराज गजधाने, प्रीती बगले व प्रणाली मराळ यांनी सहभाग नोंदवला.

यश वाघमारे व योगेश सोनवणे यांनी वाद्यसंगीताची साथ दिली. लोकगीताची जबाबदारी योगेश सोनवणे यांनी, लोकनृत्याचे मार्गदर्शन रक्षिता सलगर-बळूरगी व शुभम बडगंची यांनी, तर पथनाट्याचे दिग्दर्शन सुशांत कोळी यांनी केले.या यशासाठी युवा क्रांती कलामंचतर्फे जयश्री सलगर, संभाजी सलगर, सागर राठोड, विशाल चव्हाण, रुपेश जाधव, सुनील वाघमोडे, सौरभ लोंढे, सलमान हिरापुरे, दादा भोसले, राहुल भैरी, अभिषेक जमादार, यश पोतदार, प्रशांत राठोड, नागराजस्वामी, लखन बनसोडे, इंद्रनील सावंत, गणेश कोळेकर, बजरंग कतारी, ओंकार उदगिरी, महामाया ढावरे, श्वेता सापटणेकर, सायली शिंगण, जानवी ज्युटलिंगे, प्रिया कांबळे, पायल कतारी, हिना बागवान, कावेरी बाविस्कर, वैष्णवी वाघमोडे व संजय शिंदे यांनी परिश्रम घेतले.
युवा क्रांती कलामंचचे संस्थापक हनुमंत सलगर तसेच ग्रीन स्पाईस प्रॉडक्शन, मुंबई यांच्या सहकार्यामुळे हे यश साकार झाले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















