पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!

प्रतिनिधी – पंढरपूर
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी वारी २०२६ निमित्त वारकरी व भाविकांसाठी उत्कृष्ट नियोजन, आवश्यक सोयी-सुविधांची उपलब्धता आणि यात्रेचे यशस्वी व्यवस्थापन केल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयएएस अधिकारी मा. कुशल जैन यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्तिकी वारीच्या काळात लाखो वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. त्यांच्या सुरक्षिततेसह सोयी-सुविधा, स्वच्छता, व्यवस्थापन आणि विविध प्रशासकीय बाबींचे योग्य नियोजन करणे हे मोठे आव्हान असते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व संबंधित यंत्रणांनी केलेल्या नियोजनबद्ध कामकाजाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनाने केलेल्या मेहनतीला मिळालेली ही कौतुकाची थाप निश्चितच अभिमानास्पद असून, जिल्हा प्रशासनाच्या कार्याला नवी प्रेरणा देणारी ठरली आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240














