पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल.

प्रतिनिधी – सोलापूर
पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी राज्यभर लढा देणाऱ्या पत्रकार सुरक्षा समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सर्वोच्च आणि पहिला मानाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार, सारा न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राम हुंडारे यांना जाहीर करण्यात आला आहे.पत्रकार सुरक्षा समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार आणि कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी एकमताने हा निर्णय घेतला.

डॉ. राम हुंडारे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सक्रिय असून, विविध माध्यमांतून जनतेचे प्रश्न मांडण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. ते सारा न्यूज नेटवर्क या न्यूज पोर्टल व न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष तसेच पोलीस मित्र असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी शासन दरबारी आंदोलने, उपोषणे, निवेदने आणि सातत्यपूर्ण पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे. पत्रकार घरकुल योजना, ग्रामीण पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास, ज्येष्ठ पत्रकारांसाठी सन्मान पेन्शन योजना, पत्रकार आरोग्य विमा आणि पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी आवाज उठवला आहे.
याशिवाय, सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणेशोत्सव काळात सलग तीन वर्षे समीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. पर्यावरण क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय असून, इकोनेचर क्लबच्या माध्यमातून राज्य समन्वयक म्हणून हजारो वृक्षांची लागवड व संवर्धन केले आहे. वृक्षतोडीविरोधातही त्यांनी सातत्याने भूमिका घेतली आहे.
सारा सामाजिक बहुउद्देशीय संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, अन्नदान, रक्तदान शिबिरे, दिवाळी फराळ वाटप यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत.
पत्रकारिता, पत्रकारांच्या हक्कांसाठीचा संघर्ष, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रांतील त्यांच्या अष्टपैलू कार्याची दखल घेत पत्रकार सुरक्षा समितीने त्यांची पहिल्या ‘जीवन गौरव पुरस्कारासाठी’ निवड केली आहे.

जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240