
प्रतिनिधी – सोलापूर
सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी नेत्ररोग, मोतीबिंदू तपासणी व दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले. या शिबिरात एकूण ८५ रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले.

सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग नियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या आदेशानुसार, प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या सहकार्याने तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु यांच्या प्रयत्नातून व नियोजनातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिरामध्ये नेत्ररोग विभागाच्या ६३ रुग्णांची, तर दंतरोग विभागाच्या २२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १३ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. नेत्ररोग तंत्रज्ञ राहुल शिंदे आणि दंतरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रिया पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले.शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु, स्टाफ नर्स सिद्धीकी, मोईन शेख (MPW), संगीता सावंत (ANM), आशा सेविका चंद्रकला सोनवणे, अश्विनी भालशंकर, वैजयंती कांबळे, सोनाली गाडे, रुकसाना इनामदार, सोहेल अरब, सपना जाधव, स्वच्छता कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या शिबिराचा लाभ घेतलेल्या अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंवे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















