
प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अब्दुल मज्जीद महमंद शेख, शेकाप्पा सिद्राम गाजूल, राजेश देशपांडे, अरुण क्षीरसागर, लतिका लोंढे, नुतन पिसे, राजेंद्र सोनकांबळे, अविनाश भोसले, अक्रम पठाण, पांडुरंग कविटकर, बापू करजखेडे, रमेश सोनके, नागनाथ धोत्रे, सुभाष फुलारी, शंकर जाधव, बादशहा मुल्ला, रमेश गायकवाड, यनमलप्पा चिट्टे आणि भीमाशंकर म्हेत्रे या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनीषा वास्ते, विस्तार अधिकारी ज्योतीराम भोसले, सदाशिव कोळी, शिवानंद सोलापूरे, सुरेश राठोड, कनिष्ठ लेखाधिकारी अंजू पाटील, संदीप घोडके, सुधीर फुलारी, मनोहर राठोड, रुपाली मोरे, जिलानी अन्सारी, रामकृष्ण पाटील, विनायक कुंचपोर, स्नेहा जाधव, शहानवाज शेख, शिवानंद नागूर, भीमाशंकर कोळी, पंडित व्हनमाने, अरुणा रांजणे आदी उपस्थित होते.
गट विकास अधिकारी मनोज राऊत यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुभेच्छा देत त्यांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी जीवन लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव आणि मार्गदर्शन हे समाजासाठी मोलाचे असून त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















