
प्रतिनिधी – सोलापूर
शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा परिषद मोर्चा गेटसमोर आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनात शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या, शिक्षक संचमान्यता, शाळांमधील निकृष्ट दर्जाचे बांधकाम तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न यांसह विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत. या प्रश्नांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी महांतेश्वर कट्टीमनी यांनी केली आहे.
शाळांमधील पायाभूत सुविधांची गुणवत्ता, आवश्यकतेनुसार शिक्षकांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे कट्टीमनी यांनी सांगितले. तसेच मागण्यांची दखल न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















