Monday, October 5, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
October 1, 2026
in solapur`
0
श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – सोलापूर

रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात तसेच विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, या मागण्यांसाठी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सोलापूरहून मुंबई मंत्रालयाकडे २५ हजार श्रमिक-कष्टकऱ्यांचा पायी लाँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी घोषणा ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत केली.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261001-WA0069.mp4

यावेळी आडम मास्तर यांनी सांगितले की, रे नगर प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी २५० कोटी रुपयांचे बीज भांडवल उपलब्ध करून द्यावे. तसेच पायाभूत सुविधांसाठी तयार असलेल्या ४०६ कोटी रुपयांच्या फेरअंदाजपत्रकास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करावा. गोदूताई परुळेकर नगरातील रस्ते, मलनिःसारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे २२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा.

कामगारांच्या प्रमुख मागण्या

तब्बल २९ वर्षांच्या अविरत संघर्षानंतर महाराष्ट्र शासनाने विडी कामगारांना महागाईच्या निर्देशांकानुसार दि. १ जुलै २०२६ पासून किमान वेतन व विशेष भत्त्यासह रु. ३७९/- देण्याचे अध्यादेश जारी केले आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सिटूच्या वतीने विडी कारखानदार व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु अद्याप त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. 

वास्तविक पाहता, विडी कामगारांना दि. १ जुलै २०२६ पासून जाहीर केलेल्या किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तसेच, माजी आमदार व्यंकप्पा पत्की समितीने विडी कामगारांसाठी केलेल्या शिफारशी लागू करणे गरजेचे आहे. त्यामध्ये गुल्लाकट्टा व छाटविडी बंद करणे, खराब तेंदूपत्ता देणे बंद करणे तसेच विडी कामगारांना देण्यात येणाऱ्या कच्च्या मालातील (तेंदूपत्ता व तंबाखू) चोरीला आळा घालणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या उपसचिवांनी दि. २९ जानेवारी २०१५ रोजी किमान मूळ वेतन व विशेष भत्त्यासह अधिसूचना जारी केली. त्यानुसार प्रत्येक यंत्रमाग कामगाराला किमान वेतन लागू होते. दि. १७/१०/२०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील यंत्रमाग कामगारांचे किमान वेतन दर टाईमरेटसह यथास्थिती पीसरेटमध्ये रूपांतरित करण्याच्या अनुषंगाने तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी मा. एच. के. जावळे समिती गठीत करण्यात आली.

यंत्रमाग उद्योगातील कामगारांचे किमान वेतन टाईमरेटसह यथास्थिती पीसरेटमध्ये रूपांतरित करून किमान वेतन पुनर्निर्धारित करण्याबाबतच्या अधिसूचनेचा मसुदा विधी व न्याय विभागाकडून तपासून घेतला. तसेच, त्या अधिसूचनेचा सुधारित मसुदा शासनाकडे तातडीने सादर करण्यासंबंधी परिपत्रक दि. १८ मे २०१७ रोजी काढण्यात आले. महाराष्ट्रात गेल्या ९ वर्षांपासून यंत्रमाग कामगारांचा हा प्रश्न प्रलंबित व अनिर्णित राहिलेला आहे. यंत्रमाग कामगारांना पीसरेटप्रमाणे किमान वेतन, सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी मंडळाच्या शिफारसी लागू करून यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची तातडीने स्थापना करावी. 

असंघटित कामगारांना दरमहा १० हजार रुपये पेन्शन द्यावी. तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या बंद असलेल्या सर्व योजना व लाभ पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली. 

“ही लढाई केवळ मागण्यांची नसून श्रमिक-कष्टकऱ्यांच्या जगण्या-मरण्याच्या अस्तित्वाची आहे. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर १६ नोव्हेंबरचा पायी लाँग मार्च अधिक व्यापक आणि तीव्र केला जाईल,” असा इशारा कॉ. आडम मास्तर यांनी दिला. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी काढण्यात येणाऱ्या लॉंग मार्च च्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री, दोन्ही मा.उपमुख्यमंत्री, मा. कामगार मंत्री, मा. उद्योग मंत्री, मा. मुख्य सचिव, संबंधित विभागाचे मा. अपर मुख्य सचिव, मा.प्रधान सचिव, मा. कामगार आयुक्त, मा. अपर कामगार आयुक्त, मा. विभागीय आयुक्त, मा. उपाध्यक्ष म्हाडा, मा. मुख्य अधिकारी म्हाडा, मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर, मा. अतिरिक्त कामगार आयुक्त व संबंधित अधिकारी यांना ईमेल द्वारे व रजिस्टर पोस्ट मार्फत मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले. पत्रकार परिषदेत १६ नोव्हेंबरच्या लाँग मार्चच्या माध्यमातून सरकारवर निर्णायक दबाव निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. लाँग मार्चमध्ये मोठ्या संख्येने श्रमिक, कष्टकरी, विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार व असंघटित कामगार सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सदर पत्रकार परिषदेत सीटू चे राज्य महासचिव ॲड.कॉ.एम.एच.शेख , माकपचे जिल्हा सचिव कॉ.युसुफ शेख मेजर, नलिनीताई कलबुर्गी,नसीमा शेख,व्यंकटेश कोंगारी, ॲड अनिल वासम, शेवंता देशमुख, रंगप्पा मरेड्डी, म.हनीफ सातखेड आदींची उपस्थिती होती.

जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Previous Post

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

Next Post

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022681

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697