
सोलापूर – प्रतिनिधी
श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. यावेळी मूकबधिर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, सारा न्यूज नेटवर्कचे संपादक डॉ. राम हुंडारे तसेच केशव कोळी (सर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आप्पासाहेब लंगोटे व डॉ. राम हुंडारे यांनी डॉ. सुधीर तारे यांच्या सामाजिक कार्याचा तसेच विश्वशांतीसाठीच्या योगदानाचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष अशोक उमाप व सचिव अरुण धोत्रे सर यांनीही डॉ. तारे यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण साजरे करत सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजयकुमार लोढे (सर) यांनी केले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240















