प्रतिनिधी – सोलापूर
बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली. श्री पावन गणपती मंदिर, बोरामणी नाका येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

या बैठकीस सोलापूर शहर बुरुड समाजाचे अध्यक्ष सूर्यकांत शेंद्रे, सरचिटणीस नवनाथ सुरवसे, बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष युवराज सुरवसे, माजी उत्सव अध्यक्ष नितीन वडतीले, ट्रस्टचे खजिनदार कमलेश वडतीले, सुरेश (देवा) वडतीले, देविदास वडतीले, लखन जतकर यांच्यासह बुरुड समाज बांधव, माता-भगिनी, ज्येष्ठ समाजसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अनिकेत वडतीले यांच्या निवडीबद्दल समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली नवरात्र महोत्सव अधिक उत्साहात व विविध सांस्कृतिक उपक्रमांसह साजरा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















