
प्रतिनिधी – सोलापूर
तीन महिन्यांपूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज पडून काही शेतकऱ्यांच्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले आहेत.

यामध्ये कासेगाव येथील प्रमोद पाटील यांना गायीसाठी ३७ हजार ५०० रुपये, धोत्रे येथील ब्रह्मानंद हिप्परगे यांना गायीसाठी ३७ हजार ५०० रुपये, बक्षीहिप्परगा येथील शिवाजी निकम यांना बैलासाठी ३२ हजार रुपये, तर कुंभारी येथील अप्पाशा इमडे यांच्या सहा म्हशींपैकी तीन म्हशींच्या नुकसानीपोटी १ लाख १२ हजार ५०० रुपये इतकी आर्थिक मदत मिळाली आहे.
दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात संबंधित शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या काळात आर्थिक मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने संकटाच्या काळात मदतीचा हात दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या मदतीसाठी विशेष प्रयत्न करणारे दक्षिण सोलापूरचे तहसीलदार मा. किरण जमदाडे साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















