प्रतिनिधी – सोलापूर
महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय यशवंत पाध्ये यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ‘संचार’चे उपसंपादक विक्रमबापू खेलबुडे यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने योगदान देत पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच संघटनात्मक पातळीवर सक्रिय भूमिका बजावणाऱ्या विक्रमबापू खेलबुडे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर सोलापूरच्या पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यंदाच्या पुरस्कारार्थींमध्ये नंदकिशोर पाटील (दैनिक लोकमत, छत्रपती संभाजीनगर), विलास मराठे (दैनिक हिंदुस्थान, अमरावती), निखिल पंडितराव (दैनिक सकाळ, कोल्हापूर), सुनील जावडेकर (दैनिक पुण्यनगरी, ठाणे-पालघर), सतीश वैजापूरकर (दैनिक सकाळ, शिर्डी-अहिल्यानगर), संजीव कुलकर्णी (दैनिक पुढारी, नांदेड) आणि डी. जे. गुरव (दैनिक लोकशाही, जळगाव) यांचा समावेश आहे.तसेच दैनिक प्रहारचे संपादक पद्मभूषण देशपांडे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून हजारो रुग्णांसाठी मदतीचा हात ठरलेले पत्रकार मंगेश चिवटे यांनाही यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कारार्थी मान्यवरांचेही मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
लवकरच राज्यातील विविध विभागांमध्ये मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, गौरवचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे.या राज्यस्तरीय पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेसाठी महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे, सचिव एकनाथ बिरवटकर, कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, उपाध्यक्ष सुधीर जाधव, खजिनदार गजानन चव्हाण व दीपाताई पाध्ये यांच्यासह गोरख तावरे, अरुण सुरवाडकर, धोंडूपंत विष्णुपुरीकर, राजेंद्र मोहिते तसेच समितीतील अनेक मान्यवर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विक्रमबापू खेलबुडे यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी झालेली निवड ही सोलापूरच्या पत्रकारिता क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- 9579838240














