प्रतिनिधी – सोलापूर
“एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश झाला की काम थांबत नाय… ते थेट पूर्ण होतं!” या भूमिकेतून महिलांच्या स्वावलंबनाला बळ देण्यासाठी तब्बल १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम केवळ शिलाई मशीन वाटपापुरता मर्यादित नसून, अनेक महिलांच्या हाताला काम आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, त्यांच्या कौशल्याला रोजगाराची जोड मिळावी आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी आत्मनिर्भर व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
शिलाई मशीनच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून, त्यांच्या उत्पन्नाचा मार्गही खुला होणार आहे. त्यामुळे या उपक्रमाकडे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
“बहिणींच्या डोळ्यातील स्वप्न जपायचे आणि त्यांच्या हाताला काम द्यायचे, हेच आमचे काम आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दिलेला शब्द केवळ बोलून न दाखवता तो प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यात आला आहे. ‘शब्द दिला… आणि तो पूर्ण केला!’ हा संदेश देत महिलांच्या स्वावलंबनासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















