Saturday, October 10, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा खर्च मर्यादित ठेवा; निधी शेतकऱ्यांसाठी वापरा – सुजात आंबेडकर.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
October 9, 2026
in solapur`
0
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा खर्च मर्यादित ठेवा; निधी शेतकऱ्यांसाठी वापरा – सुजात आंबेडकर.
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – सोलापूर

राज्यात दुष्काळाचे सावट असताना नाशिक कुंभमेळ्यावर अनावश्यक खर्च करण्याऐवजी उपलब्ध निधीचा उपयोग शेतकरी आणि दुष्काळग्रस्त भागांसाठी करावा, अशी ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांनी मांडली.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261009-WA0032.mp4

शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत सुजात दादा आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

नाशिक कुंभमेळा प्राथमिक स्वरूपात आणि मर्यादित खर्चात आयोजित केला पाहिजे. कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनावश्यक खर्च करण्याऐवजी तो निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, दुष्काळग्रस्त भागांतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि आवश्यक उपाययोजनांसाठी वळवला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकरी विविध संकटांचा सामना करत असताना शासनाने त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. धार्मिक मेळाव्यांवर खर्च करण्यापेक्षा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे आणि दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देणे महत्त्वाचे असल्याचेही आंबेडकर यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी धार्मिक मेळाव्यांना साधू-संत, बुवा-बाबा आणि भाविकांची मोठी उपस्थिती असली, तरी केवळ देवाच्या भरवशावर संकटे दूर होणार नाहीत, अशी परखड टिप्पणी केली. संकटांचा सामना करण्यासाठी प्रत्यक्ष उपाययोजना, योग्य नियोजन आणि जनतेच्या हितासाठी निधीचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला.नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चावरून सुजात आंबेडकर यांनी मांडलेली ही भूमिका आगामी काळात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क –9579838240

Previous Post

दक्षिण सोलापुरातील वीज पडून जनावरांचा मृत्यू; बाधित शेतकऱ्यांना लाखोंची आर्थिक मदत- तहसीलदार किरण जमदाडे यांचे विशेष प्रयत्न.

Next Post

महापूर-दुष्काळातून सावरतोय तोच लोडशेडिंगचा फटका; सहा गावांतील शेतकऱ्यांचे अधीक्षक अभियंत्यांना साकडे-अमर पाटील(शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख) 

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
महापूर-दुष्काळातून सावरतोय तोच लोडशेडिंगचा फटका; सहा गावांतील शेतकऱ्यांचे अधीक्षक अभियंत्यांना साकडे-अमर पाटील(शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख) 

महापूर-दुष्काळातून सावरतोय तोच लोडशेडिंगचा फटका; सहा गावांतील शेतकऱ्यांचे अधीक्षक अभियंत्यांना साकडे-अमर पाटील(शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख) 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसहभागातून साकार होणार हैद्रा देवस्थानचा सौरऊर्जा प्रकल्प; ट्रस्टचा निर्णय.

लोकसहभागातून साकार होणार हैद्रा देवस्थानचा सौरऊर्जा प्रकल्प; ट्रस्टचा निर्णय.

by Janta Sangharsh News
October 10, 2026
0

प्रतिनिधी - अक्कलकोट, लाखो भाविकांचे आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजा पीर सैफुलमुलक चिस्ती दर्गा हैद्रा देवस्थान येथे सुमारे १८ ते...

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर; केंद्रीय पथकाकडून शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी.

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर; केंद्रीय पथकाकडून शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी.

by Janta Sangharsh News
October 10, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाने बार्शी...

महापूर-दुष्काळातून सावरतोय तोच लोडशेडिंगचा फटका; सहा गावांतील शेतकऱ्यांचे अधीक्षक अभियंत्यांना साकडे-अमर पाटील(शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख) 

महापूर-दुष्काळातून सावरतोय तोच लोडशेडिंगचा फटका; सहा गावांतील शेतकऱ्यांचे अधीक्षक अभियंत्यांना साकडे-अमर पाटील(शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख) 

by Janta Sangharsh News
October 9, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर महापूर आणि दुष्काळाच्या दुहेरी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहा गावांतील शेतकऱ्यांना आता महावितरणच्या सक्तीच्या...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा खर्च मर्यादित ठेवा; निधी शेतकऱ्यांसाठी वापरा – सुजात आंबेडकर.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा खर्च मर्यादित ठेवा; निधी शेतकऱ्यांसाठी वापरा – सुजात आंबेडकर.

by Janta Sangharsh News
October 9, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर राज्यात दुष्काळाचे सावट असताना नाशिक कुंभमेळ्यावर अनावश्यक खर्च करण्याऐवजी उपलब्ध निधीचा उपयोग शेतकरी आणि दुष्काळग्रस्त भागांसाठी करावा,...

दक्षिण सोलापुरातील वीज पडून जनावरांचा मृत्यू; बाधित शेतकऱ्यांना लाखोंची आर्थिक मदत- तहसीलदार किरण जमदाडे यांचे विशेष प्रयत्न.

दक्षिण सोलापुरातील वीज पडून जनावरांचा मृत्यू; बाधित शेतकऱ्यांना लाखोंची आर्थिक मदत- तहसीलदार किरण जमदाडे यांचे विशेष प्रयत्न.

by Janta Sangharsh News
October 10, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तीन महिन्यांपूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज पडून काही शेतकऱ्यांच्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता....

हुंडा मागणी कलम ४९८-अ व ३४ च्या खटल्यातून पती, सासु व दिराची निर्दोष मुक्तता ; फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४८(१) अन्वये आदेश.

हुंडा मागणी कलम ४९८-अ व ३४ च्या खटल्यातून पती, सासु व दिराची निर्दोष मुक्तता ; फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४८(१) अन्वये आदेश.

by Janta Sangharsh News
October 8, 2026
0

​प्रतिनिधी - ​सोलापूर विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ व हुंडा मागणी केल्याच्या आरोपाखाली दाखल खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी...

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक ;पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक ;पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

by Janta Sangharsh News
October 8, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी निखिल सुक्रे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील विविध पत्रकार संघटना आक्रमक झाल्या...

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा; अभिनयाचा अष्टपैलू ‘नटसम्राट’ हरपला

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा; अभिनयाचा अष्टपैलू ‘नटसम्राट’ हरपला

by Janta Sangharsh News
October 8, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार, संवेदनशील आणि प्रभावी अभिनयाने रसिकांच्या मनावर अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ...

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलबुडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलबुडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय यशवंत पाध्ये यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या...

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी – सोलापूर “एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश झाला की काम थांबत नाय… ते थेट पूर्ण होतं!” या भूमिकेतून महिलांच्या स्वावलंबनाला...

Load More

वेबसाईट दर्शक

0023596

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697