Saturday, October 10, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

लोकसहभागातून साकार होणार हैद्रा देवस्थानचा सौरऊर्जा प्रकल्प; ट्रस्टचा निर्णय.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
October 10, 2026
in Akkalkot
0
लोकसहभागातून साकार होणार हैद्रा देवस्थानचा सौरऊर्जा प्रकल्प; ट्रस्टचा निर्णय.
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – अक्कलकोट,

लाखो भाविकांचे आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजा पीर सैफुलमुलक चिस्ती दर्गा हैद्रा देवस्थान येथे सुमारे १८ ते २० लाख रुपये खर्चाचा सौरऊर्जा प्रकल्प आता लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे. याबाबत देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतला असून, लवकरच प्रकल्पाचे काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रफिक मुजावर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

यापूर्वी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे २० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प देणगी स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वी हैद्रा देवस्थान ट्रस्टने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. मात्र, अद्याप देवस्थान ट्रस्टला कोणतीही रोख रक्कम किंवा धनादेश प्राप्त झालेला नसल्याने या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च सामाजिक बांधिलकीतून आणि लोकसहभागातून उचलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुजावर यांनी स्पष्ट केले.

वीजबिलाच्या खर्चात होणार मोठी बचत

हैद्रा देवस्थानला सध्या दरमहा सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे वीजबिल येते. त्यामुळे देवस्थानच्या व्यवस्थापनावर मोठा आर्थिक भार पडत आहे. सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर वीजखर्चात मोठी बचत होण्याची अपेक्षा आहे. बचत होणारा निधी धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांसाठी वापरणे शक्य होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी भाविक, नागरिक आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान

हैद्रा देवस्थानला अक्कलकोट तालुक्यात विशेष धार्मिक महत्त्व आहे. तालुक्यातील विविध निवडणुकांच्या शुभारंभासाठी नारळ फोडण्याची परंपरा या देवस्थानातून सुरू होत असल्याचे सांगितले जाते. जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात आणि नवसपूर्तीसाठीही गर्दी करतात. विविध धर्मांच्या भाविकांना जोडणारे श्रद्धास्थान म्हणूनही या देवस्थानाची ओळख आहे.

आता लोकसहभागातून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या निर्णयामुळे देवस्थानच्या वीजखर्चात बचत होण्याबरोबरच सामाजिक सहभागातून विकासकामांना चालना मिळणार आहे.

यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष बंदेनवाज मुजावर, सचिव वकील मुजावर आणि नागनहळळी आश्रमशाळेचे सचिव जावेद पटेल आदी उपस्थित होते.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर; केंद्रीय पथकाकडून शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसहभागातून साकार होणार हैद्रा देवस्थानचा सौरऊर्जा प्रकल्प; ट्रस्टचा निर्णय.

लोकसहभागातून साकार होणार हैद्रा देवस्थानचा सौरऊर्जा प्रकल्प; ट्रस्टचा निर्णय.

by Janta Sangharsh News
October 10, 2026
0

प्रतिनिधी - अक्कलकोट, लाखो भाविकांचे आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजा पीर सैफुलमुलक चिस्ती दर्गा हैद्रा देवस्थान येथे सुमारे १८ ते...

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर; केंद्रीय पथकाकडून शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी.

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर; केंद्रीय पथकाकडून शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी.

by Janta Sangharsh News
October 10, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाने बार्शी...

महापूर-दुष्काळातून सावरतोय तोच लोडशेडिंगचा फटका; सहा गावांतील शेतकऱ्यांचे अधीक्षक अभियंत्यांना साकडे-अमर पाटील(शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख) 

महापूर-दुष्काळातून सावरतोय तोच लोडशेडिंगचा फटका; सहा गावांतील शेतकऱ्यांचे अधीक्षक अभियंत्यांना साकडे-अमर पाटील(शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख) 

by Janta Sangharsh News
October 9, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर महापूर आणि दुष्काळाच्या दुहेरी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहा गावांतील शेतकऱ्यांना आता महावितरणच्या सक्तीच्या...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा खर्च मर्यादित ठेवा; निधी शेतकऱ्यांसाठी वापरा – सुजात आंबेडकर.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा खर्च मर्यादित ठेवा; निधी शेतकऱ्यांसाठी वापरा – सुजात आंबेडकर.

by Janta Sangharsh News
October 9, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर राज्यात दुष्काळाचे सावट असताना नाशिक कुंभमेळ्यावर अनावश्यक खर्च करण्याऐवजी उपलब्ध निधीचा उपयोग शेतकरी आणि दुष्काळग्रस्त भागांसाठी करावा,...

दक्षिण सोलापुरातील वीज पडून जनावरांचा मृत्यू; बाधित शेतकऱ्यांना लाखोंची आर्थिक मदत- तहसीलदार किरण जमदाडे यांचे विशेष प्रयत्न.

दक्षिण सोलापुरातील वीज पडून जनावरांचा मृत्यू; बाधित शेतकऱ्यांना लाखोंची आर्थिक मदत- तहसीलदार किरण जमदाडे यांचे विशेष प्रयत्न.

by Janta Sangharsh News
October 10, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तीन महिन्यांपूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज पडून काही शेतकऱ्यांच्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता....

हुंडा मागणी कलम ४९८-अ व ३४ च्या खटल्यातून पती, सासु व दिराची निर्दोष मुक्तता ; फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४८(१) अन्वये आदेश.

हुंडा मागणी कलम ४९८-अ व ३४ च्या खटल्यातून पती, सासु व दिराची निर्दोष मुक्तता ; फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४८(१) अन्वये आदेश.

by Janta Sangharsh News
October 8, 2026
0

​प्रतिनिधी - ​सोलापूर विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ व हुंडा मागणी केल्याच्या आरोपाखाली दाखल खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी...

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक ;पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक ;पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

by Janta Sangharsh News
October 8, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी निखिल सुक्रे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील विविध पत्रकार संघटना आक्रमक झाल्या...

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा; अभिनयाचा अष्टपैलू ‘नटसम्राट’ हरपला

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा; अभिनयाचा अष्टपैलू ‘नटसम्राट’ हरपला

by Janta Sangharsh News
October 8, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार, संवेदनशील आणि प्रभावी अभिनयाने रसिकांच्या मनावर अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ...

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलबुडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलबुडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय यशवंत पाध्ये यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या...

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी – सोलापूर “एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश झाला की काम थांबत नाय… ते थेट पूर्ण होतं!” या भूमिकेतून महिलांच्या स्वावलंबनाला...

Load More

वेबसाईट दर्शक

0023596

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697