Thursday, August 20, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थांच्या पालखी-रथाची भव्य मिरवणूक; रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
July 28, 2026
in Akkalkot, solapur`
0
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -अक्कलकोट, दि. २८ जुलै, २०२६

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना स्वामीभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी व सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन बुधवार, दि. २९ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले असून, हजारो स्वामीभक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक पार पडणार आहे.

मंडळाच्या नवीन वाहनतळ शेड परिसरातून निघणाऱ्या या मिरवणुकीत विविध दिंड्या, पारंपरिक वाद्यांचा गजर, मुंबईच्या स्वरांजली बँडपथकाचे सादरीकरण, विजुभाई तांडेल यांच्या आराध्य ढोलपथकाचा दमदार निनाद तसेच अमोलराजे लेझीम संघाच्या आकर्षक सादरीकरणामुळे संपूर्ण अक्कलकोट नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

या पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ आमदार शेखर निकम, भरत मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजीराजे पवार, नगरसेवक अमोल शिंदे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. नितीन हबीब, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष चेतन नरोटे, शिक्षण सभापती संकेत पिसे, मुंबईचे नगरसेवक विजु तांडेल, देणगीदार सायन संतोष नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. महोत्सवाचे आयोजन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले  करणार आहेत.

दरम्यान, गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त २७ ते २९ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरालाही स्वामीभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या संख्येने भाविक रक्तदानासाठी पुढे सरसावत असून, या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

 

गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम, श्री स्वामी समर्थांचे दर्शन, महाप्रसाद तसेच सेवा उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी सर्व स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रम वेळेवर पार पडणार असल्याने भाविकांनी वेळेत उपस्थित राहून श्री स्वामींच्या दर्शनाचा व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी केले आहे.

Previous Post

रोटरी क्लबचे कार्य म्हणजे समाजसेवेचा आदर्श – नगरसेवक महेश इंगळे.

Next Post

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांना कायम करणेसाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांना कायम करणेसाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आताचा बदल नागरिकांसमोर प्रभावीपणे मांडता येतो. छायाचित्रांमुळे हा बदल लोकांच्या स्मरणात...

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि उदरनिर्वाहासाठी पेंटिंग, पिग्मी एजंट तसेच डिश टीव्ही जोडणीची कामे करणाऱ्या चंद्रकांत इंगळे यांनी...

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

  प्रतिनिधी- सांगली कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उल्लेखनीय प्रशासकीय कार्यातून जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना ‘लोकमत...

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -माढा, दि. १८ ऑगस्ट २०२६ : माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, म्हैसगाव (मुले) या पूरग्रस्त शाळेतील...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी – अक्कलकोट भाजप आमदार राम कदम यांनी आज अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट  भाजप आमदार राम कदम यांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच दर्शन...

देवस्थान कार्यालयात आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, नगरसेवक महेश हिंडोळे, मनोज इंगुले व अन्य.

स्वामींचा सेवाव्रत निष्ठेने पुढे नेणारे महेश इंगळे यांना भेटून आनंद झाला : आमदार बसवराज पाटील 

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट, दि. १७ ऑगस्ट २०२६ श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नसून कोट्यवधी भक्तांचा श्वास आहेत. ‘भिऊ नकोस,...

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट स्वातंत्र्य दिनानिमित्त गोगांव ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण, राष्ट्रपुरुषांच्या...

जैन गुरुकुलात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

जैन गुरुकुलात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेच्या प्रांगणात ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा मुख्याध्यापक राजकुमार काळे...

ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा विलोभनीय संचलन आणि सांस्कृतिक आविष्कार!

ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा विलोभनीय संचलन आणि सांस्कृतिक आविष्कार!

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर  नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये १५ ऑगस्ट रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा...

Load More

वेबसाईट दर्शक

0007159

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697