Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 4, 2026
in solapur`
0
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर

जिल्हा परिषद सोलापूरच्या स्थायी समितीची बैठक अध्यक्ष तथा सभापती दीपक अरुण वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात झाली. जिल्ह्याच्या विकासकामांना गती देतानाच गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांना प्रभावी सेवा मिळण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

शिक्षण विभागाच्या आढाव्यात ११ तालुक्यांत ११ आदर्श शाळा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.आरोग्य विभागाच्या चर्चेत सर्पदंश व रेबीज प्रतिबंधक उपाययोजना, तसेच आरोग्य संस्थांमध्ये औषधांचा सुरक्षित साठा करण्यासाठी आवश्यक जागेची उपलब्धता या विषयांवर चर्चा झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर भर देण्यात आला.जिल्हा परिषदेच्या ‘शिवरत्न सभागृहाला ‘“भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह”’ असे नामकरण करण्याचा ठराव उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सभागृहापुढे मांडला.

यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. कामांची गुणवत्ता, निधीचा योग्य वापर आणि पारदर्शकता याबाबत संबंधित विभागांनी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर २५ जून २०२६ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यात आले. शासनाकडून प्राप्त महत्त्वपूर्ण परिपत्रके व शासन निर्णयांचे वाचन करून नोंद घेण्यात आली.बैठकीस उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समिती सभापती इंद्रजीत गुलचंद्र पवार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह तात्यासाहेब केदार, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती रामप्पा चंद्रशेखर चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता नागनाथ वाघे, समाजकल्याण समिती सभापती संस्कृती राम सातपुते, समिती सदस्य पृथ्वीराज दिलीप माने, आदिनाथ नरहरी देशमुख, रश्मी दिगंबर बागल, बालाजी तुळशीराम नरुटे आणि रमेश श्रीमंत भांजे उपस्थित होते.प्रशासकीय स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा सदस्य सचिव सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

Previous Post

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन.

Next Post

जनसेवक महादेव कोगनुरे यांच्या लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या YO BYKES शोरूमचे दिमाखदार उद्घाटन.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
जनसेवक महादेव कोगनुरे यांच्या लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या YO BYKES शोरूमचे दिमाखदार उद्घाटन.

जनसेवक महादेव कोगनुरे यांच्या लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या YO BYKES शोरूमचे दिमाखदार उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022739

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697