Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी एम. एस. सरकाझी यांच्या समर्थनार्थ नागरिकांची भूमिका; बदनामीची चौकशी करण्याची मागणी.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
July 17, 2026
in solapur`
0
0
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी-औराद,

औराद मंडळाचे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी श्री. एम. एस. सरकाझी यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून काही वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि इतर प्रसारमाध्यमांतून सातत्याने बातम्या प्रसिद्ध होत असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तथ्य समोर आणण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली असता सरकाझी हे नियोजित दिवशी मुख्यालयात उपस्थित राहून नागरिकांची विविध महसुली कामे वेळेत व नियमानुसार करत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. निराधार योजनांची चौकशी, रस्ते ताबा प्रकरणे, दुरुस्तीची कामे, विनापरवाना वाळू व मुरूम उत्खनन तसेच वाहतुकीविरुद्ध दंडात्मक कारवाईचे प्रस्ताव सादर करणे, जमिनींची खरेदी-विक्री, हक्कसोड, बक्षीसपत्र, बोजा चढविणे-कमी करणे व वाटपाच्या नोंदी अशा विविध कामांमध्ये त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कार्य केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.याशिवाय सप्टेंबर २०२५ मध्ये सिना नदीला आलेल्या पुरादरम्यान सरकारी मदत पोहोचण्यास विलंब होत असताना  सरकाझी यांनी स्वतःच्या खर्चातून पूरग्रस्तांसाठी अन्नाची व्यवस्था केली. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्याने मदतकार्य उभे. केले. तत्कालीन तहसीलदार, मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) यांच्या समवेत पूरग्रस्त गावांमध्ये पिण्याचे पाणी, धान्य व इतर जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पूरस्थितीत सलग आठ ते दहा दिवस मुख्यालयात मुक्काम करून नागरिकांच्या सेवेसाठी कार्य केल्याचेही सांगण्यात आले.दरम्यान, काही प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या महसुली नोंदी रद्द झाल्याच्या वृत्ताबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, काही नोंदी सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाल्या असून, काही प्रकरणांमध्ये इतर हक्कातील बोजा असल्याने नियमांनुसार व्यवहार मंजूर करणे शक्य नव्हते. संबंधित प्रकरणांमध्ये नियमानुसार कार्यवाही करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या पार्श्वभूमीवर कोणतेही ठोस पुरावे न देता मंडळ अधिकाऱ्यांची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबत प्रतिक्रिया देताना प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “लोकसेवेसाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. अशा प्रकारच्या बदनामीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. अन्यथा जनतेच्या पाठिंब्याने व्यापक जनआंदोलन उभारले जाईल.”

Previous Post

सोलापूर सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय: आरोपी चिंता यांना अटकपूर्व जामीन मंजूर.

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंत्रोळी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंत्रोळी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022694

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697