Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

कृषी पर्यटनासह युवा उद्योगाला चालना; ‘सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्रा’चा ५ सप्टेंबरला शुभारंभ.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 27, 2026
in solapur`
0
कृषी पर्यटनासह युवा उद्योगाला चालना; ‘सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्रा’चा ५ सप्टेंबरला शुभारंभ.
0
SHARES
73
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – सोलापूर

शेतकरी, युवक आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ड्रीम फाउंडेशन संचलित ‘श्री. सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्र’ आणि **‘ड्रीम युवा बिझनेस फोरम’**च्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्राचा शुभारंभ शनिवार, ५ सप्टेंबर रोजी राम रेड्डी यांच्या हस्ते होणार आहे.

सोलापूर पर्यटन जागर अभियानांतर्गत कुमठे शिवारा, मामुरे वस्ती, सोरेगाव तसेच कुमठे रोड आणि विजापूर रोड परिसरात कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्यात आले आहे. या केंद्रात फार्म हाऊस, होम स्टे, पारंपरिक खाद्य महोत्सव आणि हर्डा महोत्सव यांसह विविध उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.या कार्यक्रमास बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नागरकर, माजी आमदार शिवशरण आण्णा, आमदार सचिन कल्याणशेट्टी, पाटील-बिराजदार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. श्री प.पू. महांतेश स्वामीजी, तडेवाडी मठ, कर्नाटक यांच्या दिव्य सान्निध्यात कार्यक्रम होणार असून सौ. गजराबाई भतगुणकी आणि गुरूशांत भतगुणकी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कृषी पर्यटन केंद्रात गार्डन, वनराई, आमराई, नारळाचे वन, सेंद्रिय भाजीपाला प्रकल्प, गोशाळा, भाकरी बेक तसेच हर्डा पार्ट्यांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मोठ्या कार्यक्रमांसाठी हॉल व लॉन आणि १२ खोल्यांची स्वतंत्र निवास व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण संस्कृती, योग, मेडिटेशन आणि निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध खाद्यपदार्थांना देशभरात ब्रँडिंग मिळवून देण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे.

ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून मागील २९ वर्षांपासून शेतकरी, युवक आणि महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती केंद्राचे संचालक काशिनाथ भतगुणकी यांनी पत्रकार परिषदेत दिली.उद्घाटनानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवर मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये वेल्दी लाईफचे संचालक धनंजय पाटील, सौ. सुप्रिया करपे, वेलनेस कोच तुकाराम अशोक टेंगमळे (लातूर), अमोल तळेकर (जालना) आणि किरण पाटील (लातूर) यांचा समावेश आहे.

दरम्यान, रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘ड्रीम युवा बिझनेस फोरम’चे उद्घाटन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष पेट्या गहू, राजू राठी आणि सारथी फाउंडेशनचे अध्यक्ष केतन शहा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मिलिंद भोसले, अमित कामितकर, प्रसाद कानडे आणि दिलीप पंतगे आदी उपस्थित राहणार आहेत. नवउद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन या माध्यमातून मिळणार आहे.ड्रीम युवा बिझनेस फोरमतर्फे दर सोमवारी शेतकऱ्यांसाठी, बुधवारी उद्योजकांसाठी, शुक्रवारी महिलांसाठी आणि रविवारी सर्वांसाठी उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती फोरमचे अध्यक्ष सतीश पाटील आणि संचालिका संगीता भतगुणकी यांनी दिली.

या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक रमेश बिराजदार, बसलिंगप्पा हिप्परगी, परमेश्वर भतगुणकी आणि कल्पना भतगुणकी यांनी केले आहे.

जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 

बातम्या व जाहिटतीसाठी संपर्क –9579838240

Previous Post

शिवसेना शिंदे ओबीसी महिला जिल्हाप्रमुख सौ. उमा माळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकल वाटप.

Next Post

सोलापूर चे सुपुत्र सहाय्यक आयुक्त सूर्यकांत श्रीमंत खटके यांची यशस्वी धाव…!

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
सोलापूर चे सुपुत्र सहाय्यक आयुक्त सूर्यकांत श्रीमंत खटके यांची यशस्वी धाव…!

सोलापूर चे सुपुत्र सहाय्यक आयुक्त सूर्यकांत श्रीमंत खटके यांची यशस्वी धाव…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022694

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697