
प्रतिनिधी-मार्डी, ता उत्तर सोलापूर
खेडेगावातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी मोठी मदत व्हावी, या उद्देशाने शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने मार्डी येथे शालेय विद्यार्थ्यांना २०० हून अधिक सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.
शिवसेना ओबीसी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली मार्डी येथील पेठेतील मारुती मंदिर परिसरात भव्य सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख सौ. उमा (ताईसाहेब) नागेश अकोलकर-माळी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
शाळेत जाण्यासाठी सायकल मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.
यावेळी अनिल माळी (उपसरपंच, वडाळा), सचिन जांभळे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, उत्तर सोलापूर), महेश गोरे (राष्ट्रवादी युवक, उत्तर सोलापूर), जोशना भाले (शिवसेना शिंदे गट तालुकाध्यक्ष, उत्तर सोलापूर), अनिनाय कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष), प्रल्हाद मामा काशिद (युवा उद्योजक), संभाजी गायकवाड, अन्नू मालक, अंकुश सामना (तेली महासंघ), योगेश माळी (शिवसेना तालुकाध्यक्ष, उत्तर सोलापूर), सुवर्णा ताई झाडे, नंदकुमार गवळी, प्रशांत काशीद, अरुण महापुरे, श्रीकांत मार्तंडे, मार्डीचे उपसरपंच यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना सौ. उमा अकोलकर-माळी म्हणाल्या की, उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी, रानमसले आणि वडाळा या गावांमध्ये यापूर्वी तीन हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे. आता शालेय विद्यार्थ्यांसाठी २०० हून अधिक सायकलींचे वाटप करण्यात येत असून, पुढील काळात महिलांसाठी पिठाची गिरणी तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी पंप वाटपाचा उपक्रम राबविण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला मार्डी व परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबन माळी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















