प्रतिनिधी -सोलापूर, बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६
एमआयएम (AIMIM) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त आज विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी सोलापूर शहरातील विविध स्थानिक, सामाजिक तसेच सद्य राजकीय विषयांवर माध्यमांशी थेट संवाद साधला.
पत्रकारांनी विचारलेल्या विविध महत्त्वाच्या प्रश्नांना इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत उत्तरे दिली. विशेषतः फारूक शाब्दि पुन्हा पक्षात येणार का? या चर्चेतील प्रश्नावर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली, याकडे उपस्थितांचे लक्ष लागले होते.
या पत्रकार परिषदेत सोलापूर शहराशी संबंधित विविध प्रश्नांसह आगामी राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यांमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.
ही पत्रकार परिषद इम्पेरियल पॅलेस फंक्शन हॉल, सोलापूर क्लबसमोर, सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती.
निमंत्रक :
शौकत पठाण — जिल्हाध्यक्ष, AIMIM सोलापूर
वाहिदा शेख — गटनेता, सोलापूर महानगरपालिका

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240
















