
प्रतिनिधी -मार्डी, ता. उत्तर सोलापूर
शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने आणि शिवसेना ओबीसी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री. रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पेठेतील मारुती मंदिर, मार्डी येथे भव्य सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शंभरहून अधिक सायकलींचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख सौ. उमा (ताईसाहेब) नागेश अकोलकर-माळी यांनी केले. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकली मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.

कार्यक्रमास अनिल माळी (उपसरपंच, वडाळा), सचिन जांभळे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, उत्तर सोलापूर), महेश गोरे (राष्ट्रवादी युवक, उत्तर सोलापूर), जोशना भाले (शिवसेना शिंदे गट तालुकाध्यक्ष, उत्तर सोलापूर), अनिनाय कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष), प्रल्हाद मामा काशिद (युवा उद्योजक), संभाजी गायकवाड, अन्नू मालक, अंकुश सामना (तेली महासंघ), योगेश माळी (शिवसेना तालुकाध्यक्ष, उत्तर सोलापूर) यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना उमा (ताईसाहेब) अकोलकर-माळी यांनी सांगितले की, उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी, रानमसले आणि वडाळा या गावांमध्ये यापूर्वी तब्बल अडीच हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे. आता शालेय विद्यार्थ्यांसाठी २०० हून अधिक सायकलींचे वाटप करण्यात येत असून, पुढील काळात महिलांसाठी पिठाची गिरणी आणि शेतकऱ्यांसाठी कृषी पंप वाटपाचा उपक्रम हाती घेण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला मार्डी व परिसरातील बहुसंख्य नागरिक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबन माळी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.















