प्रतिनिधी – सोलापूर
मराठा सेवा संघ, सोलापूर जिल्हा व शहर विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश दत्तात्रय गोडसे यांची बदली रद्द करून त्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

अविनाश गोडसे हे मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष असून, ते बदलीस पात्र नसतानाही केवळ मराठा समाजातील असल्याच्या कारणातून काही कर्मचाऱ्यांनी त्यांना बोलावून दबाव आणत स्वाक्षऱ्या घेतल्या आणि जाणीवपूर्वक त्यांची बदली करण्यात आली, असा आरोप मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ही बदली अन्यायकारक असून, ती तातडीने रद्द करून गोडसे यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली.

सदर बदली रद्द न केल्यास संबंधित कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मराठा सेवा संघ, सोलापूर जिल्हा व शहर विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी. के. देशमुख, शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, शहर उपाध्यक्ष सचिन चव्हाण, तसेच लिंबराज जाधव, राजू व्यवहारे, दत्ता जाधव, प्रकाश डोंगरे, राजेंद्र भोसले, संतोष माने, जीवन यादव, मल्लिकार्जुन, शेखर भोसले, दास यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मागणी करण्यात आली.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क–9579838240
















