प्रतिनिधी -पंढरपूर
‘जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना’, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे सोलापूर जिल्हा पालक अध्यक्ष मा. हुसेनबाशा मुजावर, जिल्हा रुग्णालय, सोलापूर येथील क्षयरोग विभागाचे श्री. मशाक मुजावर, डॉ. सोहिल मुजावर, तसेच माननीय चंद्रकांत डहाळे, रमेशराव शहाणे (जलसंपदा), संतोष शहाणे आणि अशोक डहाळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सोलापूर जिल्हा पालक अध्यक्ष मा. हुसेनबाशा मुजावर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन गौरविण्यात आले. तसेच उपस्थित सोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांचे शब्दसुमनांनी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
















