Monday, November 23, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

अक्कलकोटमध्ये टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी; गरीब विद्यार्थ्यांना शालेय बॅग व मिठाई वाटप.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
November 23, 2026
in solapur`
0
अक्कलकोटमध्ये टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी; गरीब विद्यार्थ्यांना शालेय बॅग व मिठाई वाटप.
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – अक्कलकोट

शेर-ए-हिंद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरात अभिवादन कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. टी.एस.एस. फाउंडेशनच्या वतीने विजय कामगार चौक येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग आणि मिठाईचे वाटप करून समाजसेवेचा आदर्श जपण्यात आला.

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी इंग्रजांविरुद्ध युद्धात पराक्रम गाजविणारे टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम बांधव, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि टिपू सुलतान यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, नगरसेवक मुस्तफा बाळोरगी, सेनेचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोहसीन मोकाशी, सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास, रशीद खिस्तके, अतिक बागवान, शकील खिस्तके आणि वसीम कुरेशी यांच्या हस्ते टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा टिपू सुलतान फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. टिपू सुलतान यांचे शौर्य, त्याग आणि देशभक्ती आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी मल्लिकार्जुन पाटील, मुस्तफा बाळोरगी, मोहसीन मोकाशी, सोहेल फरास, रशीद खिस्तके, अतिक बागवान, शकील खिस्तके, वसीम कुरेशी यांच्यासह फाउंडेशनचे सैफन शेख, बाबा गोलंदाज, एम.जी. शेख, असलम रेड्डी, राजू मुल्ला, अकबर सुतार आणि फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहसीन मोकाशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार टी.एस.एस. फाउंडेशनचे अध्यक्ष सैफन शेख यांनी मानले. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी दिली.

जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

Next Post

सोलापूरच्या रश्मी बोराडे यांचे AIWAA 2026 मध्ये ‘Outstanding Educator’ पुरस्कारासाठी नामांकन.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
सोलापूरच्या रश्मी बोराडे यांचे AIWAA 2026 मध्ये ‘Outstanding Educator’ पुरस्कारासाठी नामांकन.

सोलापूरच्या रश्मी बोराडे यांचे AIWAA 2026 मध्ये ‘Outstanding Educator’ पुरस्कारासाठी नामांकन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरच्या रश्मी बोराडे यांचे AIWAA 2026 मध्ये ‘Outstanding Educator’ पुरस्कारासाठी नामांकन.

सोलापूरच्या रश्मी बोराडे यांचे AIWAA 2026 मध्ये ‘Outstanding Educator’ पुरस्कारासाठी नामांकन.

by Janta Sangharsh News
November 23, 2026
0

शैक्षणिक क्षेत्रातील सात वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल.  प्रतिनिधी - सोलापूर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी...

अक्कलकोटमध्ये टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी; गरीब विद्यार्थ्यांना शालेय बॅग व मिठाई वाटप.

अक्कलकोटमध्ये टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी; गरीब विद्यार्थ्यांना शालेय बॅग व मिठाई वाटप.

by Janta Sangharsh News
November 23, 2026
0

प्रतिनिधी - अक्कलकोट शेर-ए-हिंद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरात अभिवादन कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. टी.एस.एस. फाउंडेशनच्या वतीने विजय...

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी नेत्ररोग, मोतीबिंदू तपासणी व...

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल. प्रतिनिधी - सोलापूर पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी राज्यभर लढा...

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथील प्रशिक्षणार्थी आलिशा शेख हिने अखिल भारतीय व्यवसाय...

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

by Janta Sangharsh News
November 16, 2026
0

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

Load More

वेबसाईट दर्शक

0046451

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697