Wednesday, October 7, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

सोलापूरात पत्रकार किरण बनसोडे लिखित‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 28, 2026
in solapur`
0
सोलापूरात पत्रकार किरण बनसोडे लिखित‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन.
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर 

पत्रकार किरण बनसोडे लिखित आणि जागृती पब्लिकेशन, सोलापूर यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मीडिया मास्टर’ या पत्रकारितेची गुरुकिल्ली ठरणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते आज उत्साहात संपन्न झाले.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260828-WA0018.mp4

डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे आयोजित प्रकाशन सोहळ्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजीराव शिंदे, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने, चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड, बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, संपादक दिलीप पेठे, संपादक प्रशांत माने, श्रमिक पत्रकार संघ सोलापूरचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश कोरे आणि उपसंपादक विजय गायकवाड यांच्यासह पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260828-WA0019.mp4

यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी ‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचे प्रकाशन करून लेखक पत्रकार किरण बनसोडे यांचे अभिनंदन केले. बदलत्या काळानुसार पत्रकारितेचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलत असून डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडियाचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत पत्रकारितेची विश्वासार्हता, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेची मूलभूत मूल्ये जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे महापौरांनी सांगितले.

पत्रकारिता क्षेत्रात नव्याने येणाऱ्या युवक-युवतींसह पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘मीडिया मास्टर’ हे पुस्तक निश्चितच उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही महापौर कोंड्याल यांनी व्यक्त केला.

या पुस्तकामध्ये पत्रकारितेतील विविध कौशल्ये, बातमी लेखन, वृत्तांकन, माध्यमांची कार्यपद्धती तसेच बदलत्या डिजिटल युगातील पत्रकारितेचे स्वरूप याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी लेखक पत्रकार किरण बनसोडे यांचे अभिनंदन करून पुस्तकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास पत्रकारिता क्षेत्रातील विद्यार्थी, पत्रकार, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 

संपादक-सिद्धार्थ भडकुंबे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

Previous Post

जैन गुरुकुलच्या गाईडस्नी पाठविली सैनिकांसाठी राखी.

Next Post

सैन्यदलातील वीर जवानांसमवेत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
सैन्यदलातील वीर जवानांसमवेत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात.

सैन्यदलातील वीर जवानांसमवेत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी – सोलापूर “एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश झाला की काम थांबत नाय… ते थेट पूर्ण होतं!” या भूमिकेतून महिलांच्या स्वावलंबनाला...

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

by Janta Sangharsh News
October 6, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कारंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले...

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

Load More

वेबसाईट दर्शक

0022907

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697