
प्रतिनिधी – सोलापूर
शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सोपा व्हावा, त्यांचा वेळ वाचावा आणि शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा, या उद्देशाने ‘भव्य सायकल वाटप योजना’ राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने विशेष योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे.
या योजनेचा शुभारंभ गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता वडाळा, ता. उत्तर सोलापूर येथील विठ्ठल मंगल कार्यालय येथे करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकल उपलब्ध झाल्याने त्यांच्या प्रवासाचा वेळ वाचण्यास तसेच शिक्षणासाठी अधिक वेळ मिळण्यास मदत होणार आहे.
या योजनेचे आयोजन सौ. उमा नागेश अकोलकर-माळी, शिवसेना जिल्हाप्रमुख ओ.बी.सी. यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच श्री. अनिल नागनाथ माळी, उपसरपंच ग्रामपंचायत वडाळा यांचे सहकार्य लाभत आहे.
सायकल वाटप योजनेसाठी नाव नोंदणी सुरू असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
- सौ. उमा नागेश अकोलकर-माळी ८८५५९८९८६३ / ९८५०२०१६३८
- अनिल नागनाथ माळी – ९७६३३३१११७















