शासकीय कामांसाठी पैशांची मागणी, फेरफार व वारस नोंदींमध्ये विलंब आणि पक्षपाती कारभाराचा आरोप; तहसीलदारांकडे तक्रार अर्ज.

प्रतिनिधी – सोलापूर

शेती खरेदी-विक्रीच्या प्रकरणांमध्ये नोंदी करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून अवाजवी पैशांची मागणी केली जाते, तसेच पैसे देणाऱ्या पक्षाच्या बाजूने निर्णय दिले जात असल्याचा गंभीर आरोपही तक्रार अर्जात करण्यात आला आहे. या कथित पक्षपाती कारभारामुळे गरीब, वंचित आणि दलित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.सुनावणी केवळ औपचारिकता म्हणून घेतली जात असून, प्रभावाखाली येऊन नोंदी केल्या जात असल्याचा आरोप करत हा प्रकार नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना व महसूल कायद्याच्या प्रक्रियेला बाधा आणणारा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या सर्व आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित मंडळ अधिकारी संतोष काशीनाथ फुलारी यांची वळसंग मंडळातून तात्काळ नेमणूक काढण्यात यावी, अशी मागणी खंडू कोंडीबा वाघामरे यांनी केली आहे. या तक्रारीवर तहसीलदार प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित प्रकरणाची चौकशी करून काय निर्णय घेतला जातो, याकडे वळसंग परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















