Wednesday, November 25, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

दुष्काळी परिस्थितीत फळबागा व पशुधन वाचविण्यासाठी शिवार बैठका घ्या; शिवसेनेची कृषी विभागाकडे मागणी.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
November 25, 2026
in solapur`
0
दुष्काळी परिस्थितीत फळबागा व पशुधन वाचविण्यासाठी शिवार बैठका घ्या; शिवसेनेची कृषी विभागाकडे मागणी.
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – माळशिरस

माळशिरस तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी बांधवांसमोर शेती आणि पशुधन जगविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत उजनी व वीर धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांना योग्य प्रकारे लाभ मिळावा, तसेच फळबागा व पशुधन टिकविण्यासाठी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने प्रत्यक्ष शिवारात मार्गदर्शन करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी माळशिरस तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर यांच्याकडे केली.धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करून फळबागा टिकविणे, ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर, पाणी व्यवस्थापन, आच्छादन तंत्रज्ञान आणि कमी पाण्यात फळबागांचे संवर्धन कसे करता येईल, याबाबत शेतकऱ्यांना तज्ज्ञांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शिवारात मार्गदर्शन मिळणे गरजेचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

तसेच दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी पाणी व चाऱ्याचे नियोजन, चारा उपलब्धता, चारा साठवणूक, पशुखाद्य व्यवस्थापन, जनावरांचे आरोग्य आणि संवर्धन याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

माळशिरस तालुक्यातील विविध गावांमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून शिवार बैठका आयोजित करून उजनी व वीर धरणातील उपलब्ध पाण्याचा फळबागांसाठी प्रभावी उपयोग कसा करता येईल, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करावे. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने पशुधन वाचविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देणारी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, अशी विनंती शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी माळशिरस तालुकाप्रमुख तानाजीराव भोळे पाटील, जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, जिल्हा संघटक बापू लोखंडे, हेमंत चव्हाण यांच्यासह तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, माळशिरस तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

 

Previous Post

वळसंग मंडळ अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी; तात्काळ बदलीची मागणी!

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळी परिस्थितीत फळबागा व पशुधन वाचविण्यासाठी शिवार बैठका घ्या; शिवसेनेची कृषी विभागाकडे मागणी.

दुष्काळी परिस्थितीत फळबागा व पशुधन वाचविण्यासाठी शिवार बैठका घ्या; शिवसेनेची कृषी विभागाकडे मागणी.

by Janta Sangharsh News
November 25, 2026
0

प्रतिनिधी - माळशिरस माळशिरस तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी बांधवांसमोर शेती आणि पशुधन जगविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले...

वळसंग मंडळ अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी; तात्काळ बदलीची मागणी!

वळसंग मंडळ अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी; तात्काळ बदलीची मागणी!

by Janta Sangharsh News
November 24, 2026
0

शासकीय कामांसाठी पैशांची मागणी, फेरफार व वारस नोंदींमध्ये विलंब आणि पक्षपाती कारभाराचा आरोप; तहसीलदारांकडे तक्रार अर्ज. प्रतिनिधी - सोलापूर  शेती...

सोलापूरच्या रश्मी बोराडे यांचे AIWAA 2026 मध्ये ‘Outstanding Educator’ पुरस्कारासाठी नामांकन.

सोलापूरच्या रश्मी बोराडे यांचे AIWAA 2026 मध्ये ‘Outstanding Educator’ पुरस्कारासाठी नामांकन.

by Janta Sangharsh News
November 23, 2026
0

शैक्षणिक क्षेत्रातील सात वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल.  प्रतिनिधी - सोलापूर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी...

अक्कलकोटमध्ये टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी; गरीब विद्यार्थ्यांना शालेय बॅग व मिठाई वाटप.

अक्कलकोटमध्ये टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी; गरीब विद्यार्थ्यांना शालेय बॅग व मिठाई वाटप.

by Janta Sangharsh News
November 23, 2026
0

प्रतिनिधी - अक्कलकोट शेर-ए-हिंद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरात अभिवादन कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. टी.एस.एस. फाउंडेशनच्या वतीने विजय...

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी नेत्ररोग, मोतीबिंदू तपासणी व...

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल. प्रतिनिधी - सोलापूर पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी राज्यभर लढा...

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथील प्रशिक्षणार्थी आलिशा शेख हिने अखिल भारतीय व्यवसाय...

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

Load More

वेबसाईट दर्शक

0047372

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697