Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाचा यशस्वी समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचा गौरव.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
July 27, 2026
in solapur`
0
निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाचा यशस्वी समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचा गौरव.
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -पंढरपूर

आषाढी वारीनिमित्त ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाचा तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. यावेळी आषाढी यात्रेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासनाच्या विविध उपक्रमांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक करताना, ‘चरणसेवा’ उपक्रमातून डॉक्टर, स्वयंसेवक आणि युवकांनी वारकऱ्यांसाठी केलेली निस्वार्थ सेवा ही महाराष्ट्राच्या युवा शक्तीचे प्रेरणादायी दर्शन घडवणारी असल्याचे गौरवोद्गार काढले.पंढरपूर पंचायत समिती येथे झालेल्या या कार्यक्रमास जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची संतपरंपरा आणि वारी ही राज्याची सांस्कृतिक ओळख असून लाखो वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने उत्कृष्ट कार्य केले आहे.यंदाच्या आषाढी वारीत सुमारे ३० ते ३५ लाख वारकऱ्यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. या पार्श्वभूमीवर स्वच्छता, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, स्नानगृहे, विश्रांती केंद्रे, मोबाईल चार्जिंग सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात आल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमातून हजारो वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार आणि औषधोपचाराचा लाभ मिळाला.पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या मनोगतात आषाढी यात्रेच्या नियोजनात, स्वच्छता व्यवस्थापनात, वारकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात तसेच सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधण्यात मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेचे विशेष कौतुक केले. स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वारी घडविण्यासाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमात ‘निर्मलवारी–समृद्धवारी’ आणि ‘चरणसेवा’ या उपक्रमांची माहिती देणारी चित्रफीत सादर करण्यात आली. तसेच विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, स्वच्छता कर्मचारी आणि सेवाभावी कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यंदाची आषाढी वारी ही केवळ भक्तीची नव्हे, तर स्वच्छता, सेवा, समन्वय आणि युवा सहभागाचा आदर्श ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. शासन, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज वारीचा अनुभव मिळाल्याचे समाधानही यावेळी व्यक्त करण्यात आले.

Previous Post

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) मध्ये जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन.

Next Post

रोटरी क्लबचे कार्य म्हणजे समाजसेवेचा आदर्श – नगरसेवक महेश इंगळे.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
रोटरी क्लबचे कार्य म्हणजे समाजसेवेचा आदर्श – नगरसेवक महेश इंगळे.

रोटरी क्लबचे कार्य म्हणजे समाजसेवेचा आदर्श - नगरसेवक महेश इंगळे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022699

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697