Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) मध्ये जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
July 27, 2026
in solapur`
0
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) मध्ये जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन.
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  1. प्रतिनिधी -सोलापूर

सोलापूर, दि. २७ जुलै : सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आरोग्य सेवांच्या गुणवत्तेच्या क्षेत्रात ऐतिहासिक यश संपादन करत जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (National Quality Assurance Standards – NQAS) प्राप्त करून दिले आहे. राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रथमच जिल्हा परिषदेच्या तीन आरोग्य संस्थांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली असून, हे यश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रभावी नियोजन, सक्षम नेतृत्व आणि आरोग्य विभागाच्या समन्वित प्रयत्नांचे फलित मानले जात आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत आरोग्य संस्थांमधील सेवा, सुविधा, स्वच्छता, रुग्ण सुरक्षा, व्यवस्थापन, रुग्णकेंद्रित सेवा, प्रभावी आरोग्य सेवा वितरण तसेच जनजागृती यांचे सखोल मूल्यांकन करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) प्रदान करण्यात येते. आरोग्य सेवेतील गुणवत्तेचे हे राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च मानांकन मानले जाते.

आज जाहीर झालेल्या NQAS मूल्यांकनाच्या निकालात सोलापूर जिल्ह्यातील तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांनी उत्कृष्ट गुणवत्ता सिद्ध करत राष्ट्रीय मानांकन प्राप्त केले. विशेष म्हणजे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि महानगरपालिका आरोग्य विभागातील विविध संस्थांपैकी केवळ जिल्हा परिषद आरोग्य विभागालाच हे मानांकन मिळाले असून, ही बाब संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची ठरली आहे.

राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त आयुष्मान आरोग्य मंदिरे :

आयुष्मान आरोग्य मंदिर, मुस्ती (प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरामणी, दक्षिण सोलापूर) – ८४.३१ टक्के

आयुष्मान आरोग्य मंदिर, येवती (प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटकुल, मोहोळ) – ८३.७३ टक्के

आयुष्मान आरोग्य मंदिर, औंधी (प्राथमिक आरोग्य केंद्र, अंकोली, मोहोळ) – ८२.०० टक्के

या मानांकनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच अधिक सुरक्षित, दर्जेदार, रुग्णकेंद्रित आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच सेवा वितरण, रुग्ण सुरक्षा, औषध व उपकरण व्यवस्थापन, नोंदवही व्यवस्थापन आणि रुग्ण समाधानात सातत्याने सुधारणा होणार आहे. याशिवाय, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मानांकन प्राप्त संस्थांना विशेष गुणवत्ता प्रोत्साहन निधी (Incentive Fund) मिळण्याची पात्रता प्राप्त होत असून, या निधीतून पायाभूत सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि रुग्ण सुविधांचा अधिक विकास केला जाणार आहे.हे ऐतिहासिक यश राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव तसेच संपूर्ण आरोग्य विभागाच्या समन्वित प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.

यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या सामूहिक परिश्रमांचा मोलाचा वाटा असून, त्यांच्या समर्पित कार्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या गुणवत्तेला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे.

Previous Post

दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न;पत्नी व सासरच्या ५ जणांविरुद्ध सोलापूर न्यायालयात खाजगी फौजदारी तक्रार.

Next Post

निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाचा यशस्वी समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचा गौरव.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाचा यशस्वी समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचा गौरव.

निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाचा यशस्वी समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचा गौरव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022699

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697