
प्रतिनिधी -सोलापूर, दि. १ ऑगस्ट २०२६
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार कृती समितीच्या वतीने भैय्या चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली हा अभिवादन कार्यक्रम पार पडला.

यावेळी नितीन करजोळे, मिलिंद प्रक्षाळे, डी. डी. पांढरे, अशोक ढोणे, गिरमल्ला गुरव, अक्षय बबलाद, अमोल कुलकर्णी, वैजिनाथ बिराजदार, अकबर शेख, आर. डी. जाधव, महेश जाधव, चैतन्य घोडके, नरेंद्र कांबळे यांच्यासह पत्रकार बांधव, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि आर.टी.आय. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि सामाजिक समतेचा संदेश अधिक व्यापक करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे वातावरण अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी कृतज्ञता आणि आदरभावाने भारावून गेले होते.















