
प्रतिनिधी – सोलापूर
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाज कृती समिती, सोलापूर शहर जिल्हाच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायकदादा कोंड्याल यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याला उजाळा देत त्यांना विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, मातंग समाज कृती समितीचे शहराध्यक्ष ॲड. शैलेश पोटफोडे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका श्रीदेवी फुलारी, नगरसेविका कल्पना कदम, नगरसेवक समाधान आवळे, मध्यवर्ती अध्यक्ष साक्षांत लोखंडे, मधुसूदन जंगम, नागेश खरात, राजाभाऊ क्षीरसागर, श्रीकांत देडे, रमेश बोराडे, आदिनाथ उडानशिवे, हिराभाऊ आडगळे, प्रभाकर कांबळे, मसुदेव रणदिवे, महेश भालेराव, शशी डोलारे यांच्यासह मातंग समाज कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.















