
अंत्रोळी (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा, सामाजिक कार्याचा आणि देशप्रेमाचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. त्यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी जीवनात अंगीकारावा, असेही यावेळी वक्त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास मुख्याध्यापक युवराज राठोड, श्रीरंग बनसोडे, नागनाथ म्हमाणे, कीर्ती जाधव, मीनाक्षी राठोड, पुष्पा बनसोडे तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन मीनाक्षी राठोड यांनी मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.















