
प्रतिनिधी -सोलापूर,
श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, बाळीवेस, सोलापूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक राजकुमार काळे, ज्येष्ठ शिक्षक सुभाष नागरसे तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा झुंजुर्डे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे अधिव्याख्याता प्रा. सुरेश हेडे, तसेच गुरुकुल परिवारातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक समतेच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. त्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी अंगीकारावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.















