Saturday, October 10, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

आषाढी वारी २०२६ : लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा परिषद सज्ज वरिष्ठ पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा पालखी मार्गावर पाहणी दौरा; सुविधा, स्वच्छता व सुरक्षिततेवर भर

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
July 16, 2026
in solapur`
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी-सोलापूर,

आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पालखी मार्ग, मुक्काम तळे आणि रिंगण सोहळ्याच्या स्थळांचा संयुक्त पाहणी दौरा करून तयारीचा आढावा घेतला.सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांच्या उपस्थितीत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा पार पडला. शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. अमृता वाघे यांनीही प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन तयारीची पाहणी केली.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, कार्यकारी अभियंता (बांधकाम) एस. व्ही. कुलकर्णी, माळशिरसचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, जिल्हा परिषद सदस्य धनाजी जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

धर्मपुरी ते वाखरीपर्यंत सूक्ष्म पाहणी-

सकाळी ९ वाजता माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथून पाहणी दौऱ्याची सुरुवात झाली. धर्मपुरी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा तळ, पुरदावडे व खुडूस येथील प्रसिद्ध गोल रिंगण स्थळ तसेच पुरदावडे प्राथमिक आरोग्य केंद्राची सविस्तर पाहणी करण्यात आली.वेळापूर येथील पालखी मुक्काम तळावर वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक जर्मन हँगर शौचालये व स्नानगृहांची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. तसेच बोंडले येथील श्री चांगा वटेश्वर महाराज पालखी तळ, बोरगाव व पिराची कुरोली येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी तळ, भंडीशेगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी तळ तसेच पंढरपूरजवळील वाखरी येथील भव्य गोल रिंगण स्थळाची पाहणी करून अंतिम तयारीचा आढावा घेण्यात आला.पिण्याच्या पाण्याच्या सुविधांवर विशेष लक्षवारी काळात लाखो भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी उभारण्यात आलेल्या पाणी टँकर फीडिंग पॉइंट्सची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाणी वितरणाचे नियोजन, उपलब्धता आणि व्यवस्थापनाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

पर्यावरणपूरक वारी’चा संदेश-

वारी केवळ सुविधा-केंद्रित न राहता पर्यावरणपूरक व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेकडून विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. पाहणी दौऱ्यादरम्यान सर्व प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या हस्ते विविध पालखी तळांवर वृक्षारोपण करण्यात आले. पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

नियोजनबद्ध पाहणीमुळे पालखी-

मार्गावरील विविध विकासकामांना वेग आला असून, “पाऊले चालती पंढरीची” म्हणत येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा परिषद पूर्णपणे सज्ज असल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले.

Previous Post

आषाढी वारी २०२६ : लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा परिषद सज्ज

Next Post

सोलापूर सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय: आरोपी चिंता यांना अटकपूर्व जामीन मंजूर.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post

सोलापूर सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय: आरोपी चिंता यांना अटकपूर्व जामीन मंजूर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसहभागातून साकार होणार हैद्रा देवस्थानचा सौरऊर्जा प्रकल्प; ट्रस्टचा निर्णय.

लोकसहभागातून साकार होणार हैद्रा देवस्थानचा सौरऊर्जा प्रकल्प; ट्रस्टचा निर्णय.

by Janta Sangharsh News
October 10, 2026
0

प्रतिनिधी - अक्कलकोट, लाखो भाविकांचे आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजा पीर सैफुलमुलक चिस्ती दर्गा हैद्रा देवस्थान येथे सुमारे १८ ते...

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर; केंद्रीय पथकाकडून शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी.

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर; केंद्रीय पथकाकडून शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी.

by Janta Sangharsh News
October 10, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाने बार्शी...

महापूर-दुष्काळातून सावरतोय तोच लोडशेडिंगचा फटका; सहा गावांतील शेतकऱ्यांचे अधीक्षक अभियंत्यांना साकडे-अमर पाटील(शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख) 

महापूर-दुष्काळातून सावरतोय तोच लोडशेडिंगचा फटका; सहा गावांतील शेतकऱ्यांचे अधीक्षक अभियंत्यांना साकडे-अमर पाटील(शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख) 

by Janta Sangharsh News
October 9, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर महापूर आणि दुष्काळाच्या दुहेरी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहा गावांतील शेतकऱ्यांना आता महावितरणच्या सक्तीच्या...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा खर्च मर्यादित ठेवा; निधी शेतकऱ्यांसाठी वापरा – सुजात आंबेडकर.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा खर्च मर्यादित ठेवा; निधी शेतकऱ्यांसाठी वापरा – सुजात आंबेडकर.

by Janta Sangharsh News
October 9, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर राज्यात दुष्काळाचे सावट असताना नाशिक कुंभमेळ्यावर अनावश्यक खर्च करण्याऐवजी उपलब्ध निधीचा उपयोग शेतकरी आणि दुष्काळग्रस्त भागांसाठी करावा,...

दक्षिण सोलापुरातील वीज पडून जनावरांचा मृत्यू; बाधित शेतकऱ्यांना लाखोंची आर्थिक मदत- तहसीलदार किरण जमदाडे यांचे विशेष प्रयत्न.

दक्षिण सोलापुरातील वीज पडून जनावरांचा मृत्यू; बाधित शेतकऱ्यांना लाखोंची आर्थिक मदत- तहसीलदार किरण जमदाडे यांचे विशेष प्रयत्न.

by Janta Sangharsh News
October 10, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तीन महिन्यांपूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज पडून काही शेतकऱ्यांच्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता....

हुंडा मागणी कलम ४९८-अ व ३४ च्या खटल्यातून पती, सासु व दिराची निर्दोष मुक्तता ; फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४८(१) अन्वये आदेश.

हुंडा मागणी कलम ४९८-अ व ३४ च्या खटल्यातून पती, सासु व दिराची निर्दोष मुक्तता ; फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४८(१) अन्वये आदेश.

by Janta Sangharsh News
October 8, 2026
0

​प्रतिनिधी - ​सोलापूर विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ व हुंडा मागणी केल्याच्या आरोपाखाली दाखल खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी...

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक ;पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक ;पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

by Janta Sangharsh News
October 8, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी निखिल सुक्रे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील विविध पत्रकार संघटना आक्रमक झाल्या...

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा; अभिनयाचा अष्टपैलू ‘नटसम्राट’ हरपला

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा; अभिनयाचा अष्टपैलू ‘नटसम्राट’ हरपला

by Janta Sangharsh News
October 8, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार, संवेदनशील आणि प्रभावी अभिनयाने रसिकांच्या मनावर अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ...

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलबुडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलबुडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय यशवंत पाध्ये यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या...

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी – सोलापूर “एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश झाला की काम थांबत नाय… ते थेट पूर्ण होतं!” या भूमिकेतून महिलांच्या स्वावलंबनाला...

Load More

वेबसाईट दर्शक

0023596

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697