
प्रतिनिधी, अक्कलकोट
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांची कीर्ती ‘सारांश’च्या विशेषांकाच्या माध्यमातून जगभर पोहोचेल, असा विश्वास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केला.मिरज येथील स्वामीभक्त अनिल दबडे यांनी संपादित केलेल्या ‘श्री स्वामी समर्थ विशेषांका’चे प्रकाशन श्री वटवृक्ष देवस्थान येथे स्वामींच्या गाभाऱ्यासमोर महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दैनिक संचारचे मुख्य वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी, कवी मारुती कटकधोड आणि संपादक अनिल दबडे उपस्थित होते.
यावेळी महेश इंगळे यांनी विशेषांकाच्या दर्जाचे आणि गुणवत्तेचे कौतुक केले. अंकातील प्रत्येक लेख वाचनीय असून स्वामी समर्थांच्या कार्याची आणि विचारांची माहिती भाविकांपर्यंत पोहोचविण्यास हा विशेषांक उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान महेश इंगळे यांच्या हस्ते संपादक अनिल दबडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वामीभक्त सखुबाई दबडे, संगीता दबडे, ऋषभ देव, ज्ञानेश्वर आवटी, मंदिर समितीचे प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, व्यंकटेश पुजारी यांच्यासह अनेक भाविक भक्त उपस्थित होते.
















