
प्रतिनिधी – सोलापूर
माध्यम साक्षरता चळवळीला अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने पत्रकार, लेखक व संपादक किरण बनसोडे लिखित आणि जागृती प्रकाशन प्रकाशित ‘मीडिया मास्टर : पत्रकारितेची गुरुकिल्ली’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ बुधवार, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

पत्रकारिता, माध्यमांचे बदलते स्वरूप आणि माध्यम साक्षरतेचे महत्त्व याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थी, पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासक तसेच जागरूक नागरिकांना माध्यमविश्व समजून घेण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.या प्रकाशन समारंभास नागरिक, पत्रकार, विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन लेखक-संपादक किरण बनसोडे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण : डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, श्री सिद्धेश्वर मंदिराशेजारी, सोलापूर
दिनांक : बुधवार, 26 ऑगस्ट 2026
वेळ : सकाळी 11 वाजता
किरण बनसोडे -लेखक-संपादक मो. 9822616141
“जागरूक नागरिक हीच खरी लोकशाहीची ताकद!”
















