
प्रतिनिधी -सोलापूर
जोहार क्रांती सेनेच्या वतीने वळसंग पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस उपनिरीक्षक (PSI) मा.रतिकांत चंद्रकांत कोळी यांचा भव्य सत्कार करून मनःपूर्वक अभिनदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी उपस्थित मान्यवरांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या सत्कार सोहळ्यास जोहार क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब भंडारे, प्रदेशाध्यक्ष जगदेवप्पा कोळी, प्रदेश कार्याध्यक्ष शिवानंदन हंचनाळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ शिरशीकर, सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष अक्षय कोळी, उपाध्यक्ष नवनाथ काळे, सोलापूर शहर कार्याध्यक्ष चंद्रकांत टिक्के, मड्डी वस्ती विभाग प्रमुख शैलेश झिपरे, शहर वस्ती विभागप्रमुख दशरथ तळवार, अक्कलकोट तालुका अध्यक्ष अमोल पटणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सोलापूर जिल्हा मीडिया प्रभारी नागेश कोळी, तसेच . मल्लिकार्जुन बेळे, सिद्धाराम हिरेमठ, राजेश रायानी, शिवप्पा येळमले, विलास गुत्तरगी, पृथ्वीराज बेळे यांच्यासह आदी कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन PSI रतिकांत कोळी यांनी आपल्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.















