
प्रतिनिधी – सोलापूर
जोहार कोळी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. तात्यासाहेब भंडारे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा व शहरातील विविध पदांवर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष मा. श्री. जगदेवप्पा कोळी, प्रदेश कार्याध्यक्ष मा. श्री. शिवानंद हंचनाळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. काशिनाथ शिरशीकर, उपाध्यक्ष मा. श्री. दत्तात्रेय कोळी आणि संपर्कप्रमुख मा. श्री. रोहित हुमनाबादकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.

यावेळी सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष श्री. अक्षय कोळी, सोलापूर शहर कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत टिक्के, शहर अध्यक्ष श्री. शिवराज शिरशीकर, शहर उपाध्यक्ष श्री. रोहित जाधव, सोलापूर शहर उत्तर अध्यक्ष श्री. नरसप्पा केजकर, शहर वस्ती विभाग प्रमुख श्री. दशरथ तळवार, मड्डी वस्ती विभाग प्रमुख श्री. शैलेश झिपरे, तसेच श्री. डॉ. सिद्धाराम हिरेमठ, संजय शिरशीकर, किरण यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून समाजहितासाठी सक्रियपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क –9579838240

















