Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 20, 2026
in solapur`
0
जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – सोलापूर 

छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आताचा बदल नागरिकांसमोर प्रभावीपणे मांडता येतो. छायाचित्रांमुळे हा बदल लोकांच्या स्मरणात कायम राहतो, असे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि एस. पी. सिक्युरिटी सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर कोंड्याल बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, वै. वा. ह.भ.प. धोंडोपंत दादा यांच्या भजनी सांप्रदायिक फडाचे अध्यक्ष नारायण सुरवसे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला.

महापौर कोंड्याल म्हणाले की, जगात घडणाऱ्या घटना आणि त्यामधील सातत्य समाजासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकारिता करते. त्याचप्रमाणे छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्यातून घटना आणि महत्त्वाचे क्षण कायमस्वरूपी जतन करतात. त्यामुळे पत्रकारितेसोबतच छायाचित्रकारांचेही महत्त्व अनन्यसाधारण आहे.

आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव सांगताना कोंड्याल यांनी २००७ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्याचे सांगितले. त्यावेळी छायाचित्रकारांनी टिपलेली प्रभागाची जुनी छायाचित्रे २०१२ च्या निवडणुकीत नागरिकांना दाखवून पूर्वीचा आणि नंतरचा विकास स्पष्टपणे मांडता आला. या बदलाची आठवण नागरिकांच्या मनात ठसली आणि त्याचा दुसऱ्यांदा निवडून येताना फायदा झाला, असे त्यांनी सांगितले. छायाचित्रकार हे इतिहासाचे साक्षीदार असून त्यांनी टिपलेला प्रत्येक महत्त्वाचा क्षण पुढील पिढ्यांसाठी मौल्यवान ठरतो, असेही त्यांनी नमूद केले.

छायाचित्र व्यक्तींचे कार्य, इतिहास जिवंत ठेवते – इंद्रजित पवार

जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी जुन्या छायाचित्रांचे महत्त्व अधोरेखित केले. एका ऐतिहासिक पुतळ्याच्या उद्घाटनाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी जुन्या छायाचित्राचा उपयोग झाल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. माणूस काळाच्या पडद्याआड गेला तरी छायाचित्र त्याचे कार्य आणि इतिहास जिवंत ठेवते. फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यामागे एक संवेदनशील पत्रकार दडलेला असतो, असे पवार म्हणाले.

छायाचित्रकार हा इतिहासाचा साक्षीदार – नारायण सुरवसे

नारायण सुरवसे म्हणाले की, छायाचित्रकाराचे काम ‘दृश्य, द्रष्टा आणि दर्शक’ या त्रिपुटीशी जोडलेले आहे. एआयच्या युगात मूळ आणि बदललेले छायाचित्र ओळखणे हे मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे छायाचित्रांची सत्यता आणि विश्वासार्हता जपण्याची जबाबदारी छायाचित्रकारांवर आहे. छायाचित्रकार एखादा क्षण टिपतो आणि त्या क्षणाचा इतिहासाचा साक्षीदार बनतो, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले. सूत्रसंचालन लखन आदाटे यांनी केले, तर सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले. यावेळी विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे छायाचित्रकार व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

Next Post

जोहार कोळी क्रांती सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
जोहार कोळी क्रांती सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार.

जोहार कोळी क्रांती सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022730

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697