Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 20, 2026
in Akkalkot, solapur`
0
परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!
0
SHARES
108
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी- अक्कलकोट

अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि उदरनिर्वाहासाठी पेंटिंग, पिग्मी एजंट तसेच डिश टीव्ही जोडणीची कामे करणाऱ्या चंद्रकांत इंगळे यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या सन २०२५च्या विभागीय परीक्षेत त्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागात पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे अक्कलकोट स्टेशन परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यांचे इयत्ता दहावी शिक्षण श्री जगद्गुरु पंचाचार्य हायस्कूल गौडगाव(अक्कलकोट स्टेशन) या ठिकाणी तर महाविद्यालयीन शिक्षण सी.बी. खेडगी’ज कॉलेज अक्कलकोट या ठिकाणी पूर्ण झाले.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260820-WA0008.mp4

चंद्रकांत इंगळे यांचा हा यशस्वी प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. शिक्षण घेत असतानाच कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून त्यांनी पेंटिंगची कामे केली. त्यानंतर पिग्मी एजंट म्हणून काम केले, तसेच डिश टीव्ही जोडणीची कामेही केली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेचे स्वप्न त्यांनी मनातून कधीही दूर होऊ दिले नाही.

२०१२ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. मात्र, मिळालेल्या नोकरीवर समाधान न मानता त्यांनी अधिकारी होण्याचे ध्येय कायम ठेवले. नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. ड्युटी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि अभ्यास यांचा समतोल साधत त्यांनी अनेक अडचणींवर मात केली.अनेकदा परिस्थिती माणसाची परीक्षा घेते; मात्र त्या परिस्थितीसमोर हार न मानता जो सातत्याने प्रयत्न करतो, तोच यशाची नवी वाट निर्माण करतो. चंद्रकांत इंगळे यांनी हे आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. कष्टाचे काम लहान-मोठे नसते आणि ध्येय मोठे असेल तर परिस्थिती अडथळा ठरत नाही, हा संदेश त्यांच्या यशातून अधोरेखित झाला आहे.सध्या पुणे येथे कार्यरत असलेल्या इंगळे यांनी नोकरी सांभाळत स्पर्धा परीक्षेची तयारी करून मिळविलेले यश अक्कलकोट स्टेशन परिसरातील युवकांसाठी विशेष प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील आणि प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येणाऱ्या तरुणांना नवी उमेद मिळाली असून, मेहनत, सातत्य आणि जिद्द असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे.

चंद्रकांत इंगळे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अक्कलकोट स्टेशन परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 

संपादक-सिद्धार्थ भडकुंबे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

Previous Post

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

Next Post

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022701

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697