Wednesday, October 7, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

वैभव वाघे खून खटला-मुलाच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी वडिलांना उच्च न्यायालयाकडून तात्पुरता वैद्यकीय जामीन.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 22, 2026
in solapur`, Crime
0
वैभव वाघे खून खटला-मुलाच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी वडिलांना उच्च न्यायालयाकडून तात्पुरता वैद्यकीय जामीन.
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात मुंबईत राहण्याच्या अटीवर ४ जानेवारी २०२७ पर्यंत जामीन.

कोल्हापूर, दि. १९ ऑगस्ट २०२६ 

सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी समरसेनजीत ऊर्फ टिपू प्रमोद गायकवाड यांना त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या गंभीर वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा आदेश मा. न्यायमूर्ती अश्विन डी. भोबे यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी दिला.

सदर प्रकरणात क्राईम नं. ०१/२०२५ असून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांसह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आरोपीने यापूर्वी सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयात जामिनासाठी केलेले अर्ज नाकारले गेले होते. सदर अर्ज हा उच्च न्यायालयातील दुसरा जामीन अर्ज होता.आरोपीच्या अल्पवयीन मुलास Thalassaemia Major हा आनुवंशिक रक्तविकार असून त्याला नियमित रक्त संक्रमण व वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. नारायण हेल्थच्या SRCC Children’s Hospital, मुंबई यांनी त्याच्यासाठी Haploidentical Bone Marrow Transplant करण्याचे नियोजन केले आहे. उपलब्ध माहितीनुसार मुलाचा १०० टक्के HLA-मॅच्ड डोनर उपलब्ध नसून त्याचे वडील ५० टक्के HLA-मॅच्ड (haploidentical) डोनर म्हणून निश्चित झाले आहेत.

मुलाच्या उपचाराच्या पार्श्वभूमीवर आरोपीने २१ ऑगस्ट २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या कालावधीसाठी तात्पुरता वैद्यकीय जामीन मागितला. आरोपीने जामिनाचा वापर केवळ मुलाच्या उपचारासाठी करण्याचे तसेच संपूर्ण कालावधीत मुंबईच्या हद्दीतच राहण्याचे मा. न्यायाल्याने आदेशीत केलेले आहे.न्यायालयाने वैद्यकीय गरज व परिस्थितीचा विचार करून आरोपीस २१ ऑगस्ट २०२६ पासून ४ जानेवारी २०२७ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर केला. यासाठी ₹५०,०००/-चा PR Bond व त्याच रकमेचे एक किंवा दोन स्थानिक जामीनदार देण्याची अट ठेवण्यात आली आहे.

जामीन कालावधीत आरोपीस मुंबईच्या हद्दीबाहेर जाण्यास मनाई असून, त्याने खेरवाडी पोलीस ठाणे, वांद्रे पूर्व, मुंबई येथे दर आठवड्याच्या पहिल्या सोमवारी हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पुराव्यात छेडछाड न करणे, तक्रारदार अथवा साक्षीदारांवर दबाव न आणणे आणि जामिनाच्या कोणत्याही अटीचा भंग न करणे अशा विविध अटी न्यायालयाने घातल्या आहेत.

यात आरोपी समरसेनजीत उर्फ टिपू प्रमोद गायकवाड तर्फे

ॲड. वृषाली मैंदाड, ॲड .सोमनिंग पुजारी ,

ॲड. शंकर नरुटे,ॲड. गायत्री कुलकर्णी,

ॲड. प्राजक्ता पुजारी, ॲड. अभिषेक देवकते,

ॲड. पराग काळे, ॲड. शुभांगी हजारे, ॲड. हृतिक होनमाने यांनी काम पाहिले.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579848240

Previous Post

अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती; शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन- बंदेनवाज कोरबू 

Next Post

देशमुख बोरगाव येथे लहुजी शक्ती सेनेच्या नूतन शाखेचे अनावरण.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
देशमुख बोरगाव येथे लहुजी शक्ती सेनेच्या नूतन शाखेचे अनावरण.

देशमुख बोरगाव येथे लहुजी शक्ती सेनेच्या नूतन शाखेचे अनावरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलबुडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलबुडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय यशवंत पाध्ये यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या...

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी – सोलापूर “एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश झाला की काम थांबत नाय… ते थेट पूर्ण होतं!” या भूमिकेतून महिलांच्या स्वावलंबनाला...

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

by Janta Sangharsh News
October 6, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कारंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले...

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

Load More

वेबसाईट दर्शक

0022957

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697