
प्रतिनिधी – सोलापूर
शहरातील विद्यानगर येथील ‘वृंदावन वास्तू’च्या नूतन वास्तुशांती कार्यक्रमानिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे युवा नेतृत्व तथा देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांनी सदिच्छा भेट देऊन गवंडी कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी वृंदावन वास्तूचे सर्वेसर्वा श्रीशैल गवंडी यांचा प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची शाल, कृपावस्त्र, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रथमेश इंगळे म्हणाले की, श्रीशैल गिरेप्पा गवंडी हे गवंडी समाजातील प्रतिष्ठित व्यावसायिक व नागरिक आहेत. त्यांनी अत्यंत तळमळीने आणि सुंदर नियोजनातून ‘वृंदावन’सारखी देखणी वास्तू उभी केली आहे. ही वास्तू केवळ विटा-मातीची इमारत नसून त्यांच्या स्वप्नांचे आणि मेहनतीचे प्रतीक आहे. या वास्तूमध्ये गवंडी कुटुंबीयांना सुख, शांती, समाधान व भरभराट लाभो तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी सदैव त्यांच्या कुटुंबावर राहो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी गवंडी कुटुंबीयांसह नगरसेवक तम्मा शेळके, कांतू धनशेट्टी, मसूती मालक, चंद्रकांत गवंडी, राहुल गवंडी, राकेश गवंडी, संतोष माने, इरण्णा गवंडी, परमेश्वर शिंदे, स्वामीनाथ चव्हाण, सूर्यकांत बनसोडे, व्यंकटेश गवंडी, अमोल गवंडी, अप्पाशा गवंडी, श्रीमंत चेंडके, मल्लिकार्जुन गवंडी, देविदास गोबरे आदींसह परिसरातील मान्यवर व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240















