
प्रतिनिधी – अक्कलकोट
जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त अक्कलकोट येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच सोलापूर कॅन्सर सेंटर हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य व कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही समाजोपयोगी उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल १७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या सामाजिक उपक्रमास अक्कलकोट शहरातील दातापीर दर्ग्याचे सय्यद शाह दातापीर साहेब, सय्यद शाह मस्तुर साहेब, सद्दाम शेरीकर, नन्नू कोरबू, मुस्तफा बाळोरगी, रऊफ पिरजादे साहेब आदी मान्यवरांनी भेट देऊन शिबिराची पाहणी केली. यावेळी त्यांनी रक्तदान व आरोग्य शिबिराच्या नियोजनाचे कौतुक करत, अशा समाजोपयोगी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी युसुफ कन्नी, आयुब मल्लभारी, सैपन शेख (राणा), नूरू जवळगेकर, बाबा शेख, साकिब खिस्तके, अशरफ गोलंदाज, मौला मुल्ला, मुस्तकीम सय्यद, बुडन चाबूकसवार, शब्बीर सुभेदार, इलियास शेख, फिरोज फरास आणि अकिब बागवान यांनी मोलाचे सहकार्य केले.


तसेच रशीद खिस्तके व सोहेल फरास यांनी शिबिराच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, वैद्यकीय पथकाचे, रक्तपेढीच्या टीमचे, नगरपालिका कर्मचाऱ्यांचे, शाळेच्या मुख्याध्यापकांचे, पोलिस बांधवांचे तसेच उत्स्फूर्तपणे रक्तदान करणाऱ्या १७३ रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी आभार मानले.

या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, आरोग्यविषयक जनजागृती आणि रक्तदानाचे महत्त्व यांचा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.















