
प्रतिनिधी -अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर
खेळ म्हणजे केवळ विजय नव्हे, तर शिस्त, जिद्द, मेहनत आणि देशाचा अभिमान आहे, असा क्रीडामंत्र देणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना विनम्र अभिवादन करून जि. प. प्राथमिक शाळा अंत्रोळी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाहू स्पोर्ट्स, दक्षिण सोलापूरचे सचिव श्रीरंग बनसोडे सर आणि खजिनदार नागनाथ म्हमाणे सर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांच्या जीवनप्रवासातून विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य, मेहनत आणि देशप्रेमाची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी मोहोळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या मुलांच्या खो-खो संघातील खेळाडूंचे, तसेच राज्यस्तरीय खो-खो खेळाडू कुमारी गौरी शिंगण हिचे विशेष अभिनंदन करण्यात आले.















