
प्रतिनिधी – सोलापूर
शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी सलाहोद्दीन शेख यांची पश्चिम महाराष्ट्र (पुणे-सोलापूर) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा वक्फ बोर्ड अध्यक्ष समीर काझी (राज्यमंत्री दर्जा) यांच्या हस्ते शेख यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.


सय्यद मुजासिम पाशा पिरजादे यांची सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्षपदी निवड; समीर काझी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.
याचवेळी सय्यद मुजासिम पाशा पिरजादे (छोटू साब पिरजादे) यांची सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनाही नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.
पुणे आणि सोलापूर या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील संघटन अधिक मजबूत करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता सलाहोद्दीन शेख यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संघटनेचा विस्तार तळागाळापर्यंत करण्यासाठी आगामी काळात व्यापक नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.सलाहोद्दीन शेख यांनी यापूर्वी केलेल्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विविध सामाजिक प्रश्न, नागरिकांच्या अडचणी, युवकांचे प्रश्न तसेच संघटनात्मक विषयांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचा विश्वास शेख यांनी व्यक्त केला.
यावेळी समीर काझी यांनी सलाहोद्दीन शेख आणि सय्यद मुजासिम पाशा पिरजादे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवसेनेची विचारधारा आणि संघटनेची उद्दिष्टे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पुणे-सोलापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना अल्पसंख्यांक विभागाची संघटनात्मक पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. आगामी काळात सलाहोद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रात संघटनात्मक उपक्रमांना वेग येण्याची शक्यता असून, सय्यद मुजासिम पाशा पिरजादे यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातही संघटन विस्ताराला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जनता संघर्ष न्यूज सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240















